Join WhatsApp Group

Ration Card 2023: रेशनकार्ड धारकांसाठी खुशखबर! 2024 पर्यंत मिळणार या योजनेचा लाभ.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Ration Card 2023 Update: जर तुम्ही रेशनकार्ड धारक असाल, आणि जर तुम्ही मोफत रेशन धान्याचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. देशातील सर्व रेशन कार्ड धारकांना मोदी सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. जे रेशनकार्ड धारक मोफत रेशन (धान्य) योजनेचा लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. देशातील सर्व रेशन दुकानांवर म्हणजेच स्वस्त धान्य दुकानावर आता मोफत रेशन योजनेद्वारे मोफत धान्य वितरित केले जाते. यापूर्वी रेशन साठी 50 रुपये शुल्क आकारले जात होते. आता त्याच रेशन दुकानांवर पोषक घटकांनी भरपूर तांदूळ (फोर्टीफाइड तांदूळ) वितरित केला जाणार आहे. फोर्टीफाइड तांदूळ सध्या देशातील 269 जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे (PDS) वितरीत केला जात आहे. आणि उर्वरित जिल्ह्यांत मार्च 2024 पर्यंत हा फोर्टीफाइड तांदूळ वितरीत केला जाणार आहे.आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि फोर्टीफाइड तांदूळ म्हणजे काय? या फोर्टीफाइड तांदळाचे वितरण कधीपर्यंत होईल याची माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

हे पण वाचा: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत सुरू करता येणारे व्यवसाय.

Ration Card 2023 Update: भारतातील 269 जिल्ह्यांमध्ये दोन टप्प्यांत फोर्टिफाइड तांदळाचे यशस्वी वितरण करण्यात आले आहे, असे संजीव चोप्रा म्हणाले. सरकारचा हा एक आगळा वेगळा आणि अतिशय यशस्वी उपक्रम असून, गेल्या दोन वर्षांत त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहे. या उपक्रमामुळे स्वस्थ भारताचा पाया घातला जाणार आहे.

हे पण पहा: फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार PM Kisan योजनेचा लाभ.

काय आहे फोर्टीफाइड तांदूळ? What is Fortified Rice?

फोर्टिफाइड तांदूळ म्हणजे सामान्य तांदळामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये आयर्न, फॉलिक अ‍ॅसिड, व्हिटॅमिन बी12 इत्यादी पोषक घटक मिसळलेले तांदूळ म्हणजे थोडक्यात पोषक घटकांनी भरलेले तांदूळ. तांदूळ फोर्टीफाइड करण्याची प्रक्रिया भात गिरण्यांमध्ये भात काढण्याच्या वेळी केली जाते. फोर्टीफाइड तांदूळ हे मनुष्याच्या शरीरातील पोषण सुधारण्यास मदत करते व अशक्तपणा आणि कुपोषणाशी लढण्यास मदत करते (Ration Card 2023 Update)

Ration Card Update 2023: 80 टक्क्यांहून अधिक भारतीय लोकांच्या जेवणात भात असतो. त्यामुळे भारतातील लोक हे स्वस्थ आणि मजबूत रहावे या कारणांसाठी आता रेशन दुकानांत फोर्टी फाइड तांदूळ म्हणजे पोषक तत्त्वांनी समृद्ध असा तांदूळ पीडीएस पद्धतीने वितरीत केला जाणार आहे. मार्च 2024 पर्यंत भारतातील सर्व रेशन दुकानात हा फोर्टीफाइड तांदूळ वितरीत केला जाणार आहे.

यादीत नाव पहाण्यासाठी येथे क्लिक करा

WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

सर्व रेशनकार्ड धारकांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे ही माहिती रेशनकार्ड धारकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या सर्व मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच सरकारी योजनां विषयक माहिती मिळवण्यासाठी Aapli Service या वेबसाईटला फॉलो करा. लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी कृषी योजना हा WhatsApp ग्रुप जॉईन करा.

हे नक्की वाचा: नविन विहिरीसाठी मिळणार 4 लाख रुपये अनुदान.

5/5 - (1 vote)

Leave a Comment