Join WhatsApp Group

Vihir Anudan Yojana: खुशखबर! शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी मिळणार ₹4 लाख अनुदान, येथे करा अर्ज.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Vihir Anudan Yojana 2023: सरकार शेतकऱ्यांसाठी विविध लाभदायक योजना राबवित असते ज्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे सोपे जावे. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी मुख्य म्हणजे पाण्याची आवश्यकता असते. पाण्याशिवाय शेती करताच येत नाही. पण प्रत्येक शेतकऱ्याकडे शेतीसाठी पाण्याचे स्रोत उपलब्ध नसतात. हा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे ‘सिंचन विहीर अनुदान योजना’ (Sinchan Vihir Anudan Yojana) राबविण्यात येत आहे. सिंचन विहीर अनुदान योजनेसाठी किती अनुदान दिले जाते? अनुदानासाठी कोण पात्र आहेत? अर्ज कोठे सादर करावा? अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? या सर्व बाबींची माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत वाचा.

Vihir Anudan Yojana 2023: सिंचन विहीर अनुदान योजनेसाठी लाभार्थी शेतकऱ्यांना यापूर्वी ₹3.00 लाख अनुदान हे दिले जात होते पण शासनाने सध्याच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सिंचन विहीरीच्या अनुदान रकमेची मर्यादा ही ₹3.00 लाखावरून ₹4.00 लाख केली आहे.

हे पण बघा: कांदा अनुदान अर्जास मुदतवाढ.

Eligibility for Vihir Anudan Yojana 2023 / सिंचन विहीर अनुदान योजनेसाठी पात्रता.

 1. लाभधारक शेतकर्‍याकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र (जमीन) सलग असणे आवश्यक.
 2. लाभधारक शेतकऱ्याच्या 7/12 सातबार्‍यावर याआधीच विहिरीची नोंद नसावी.
 3. लाभधारक शेतकर्‍याकडे जॉब कार्ड (Job Card) असणे आवश्यक आहे.
 4. लाभधारकाकडे आपल्या एकूण क्षेत्राचा दाखला असणे आवश्यक आहे.
 5. एकापेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील मात्र त्यांचे एकूण सलग जमीनीचे क्षेत्र 0.40 हेक्टर पेक्षा जास्त असावे.

हे नक्की वाचा: शेतकऱ्यांना कडबा कुट्टी मशिन घेण्यासाठी मिळणार ₹20,000/- अनुदान.

How to Apply for Vihir Anudan Yojana 2023 / सिंचन विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा.

 • सिंचन विहीर अनुदान योजनेसाठी इच्छुक अजदारांनी विहीत नमुन्यातील अर्ज (प्रपत्र अ- अर्जाचा नमुना व ब- संमती पत्र सोबत जोडलेले) आणि
 • सर्व कागदपत्रे ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्या मदतीने पंचायत समितीच्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना कक्षाकडे जमा करावी लागतील.
 • ऑनलाईन व्यवस्था तयार झाल्यावर लाभार्थ्याने शक्य तोवर ऑनलाईन अर्ज करावा.

हे पण बघा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! राज्यात सलोखा योजना जाहीर.

Important Documents for Vihir Anudan Yojana 2023 / सिंचन विहीर अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे.

 1. आधार कार्ड
 2. रेशनकार्ड
 3. 7/12 सातबारा उतारा.
 4. 8 अ उतारा.
 5. जॉबकार्ड
 6. बँक पासबुक
 7. रहिवासी दाखला
WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
GR बघण्यासाठी येथे क्लिक करा

सिंचन विहीर अनुदान योजनेची ही माहिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे ही माहिती आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि अशाच सरकारी योजनांविषयक माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या.

हे नक्की वाचा: भारत सरकार ₹100 चे नाणे जारी करणार.

FAQ Sinchan Vihir Anudan Yojana 2023

Q. सिंचन विहीर अनुदान योजनेसाठी किती अनुदान मिळणार?

Ans. ₹4.00 लाख

Q. सिंचन विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा?

Ans. ऑफलाईन

Q. सिंचन विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज कोठे करावा?

Ans. ग्रामपंचायत

5/5 - (1 vote)

Leave a Comment