Kadba Kutti Machine Yojana : नमस्कार शेतकरी बांधवांनो, केंद्र शासन आणि राज्य शासन आपल्या शेतकरी बांधवांच्या हितासाठी नेहमीच विविध योजना राबवित असतात. या योजनांचा फायदा घेऊन शेतकर्यांना शेती करणे सोपे व सुखकर व्हावे असा या सरकारी योजनांचा उद्देश आहे. त्यातच आता सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे जनावरांच्या चाऱ्याचा म्हणजे कडबा कुट्टी मशीन घेण्यासाठी शेतकऱ्यांना 20 हजार रुपयांपर्यंत म्हणजेच 50 टक्के अनुदान हे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. या सरकारी योजनेसाठी कोण पात्र आहे? आवश्यक कागदपत्रे कोणती? अर्ज कोठे करावा? या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
Kadba Kutti Machine Yojana 2023 : शेतकऱ्यांकडे शेती करण्यासाठी जनावरे ही असतातच त्या जनावरांना चारा कुट्टी न करता टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात चारा हा वाया घालवला जातो. त्यामुळे शासनाने कडबा कुट्टी मशिन घेण्यासाठी कडबा कुट्टी मशिन अनुदान योजना आणली आहे त्याद्वारे शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान हे कडबा कुट्टी मशिन घेण्यासाठी दिले जाणार आहे.
हे नक्की बघा : PM Kisan योजनेचा 14 वा हप्ताया तारखेला होणार जमा
Kadba Kutti Machine Yojana : कोणाला किती अनुदान मिळणार
- अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना 50 टक्के म्हणजेच 20 हजार रुपये अनुदान मिळेल.
- महिला व लहान शेतकऱ्यांनाही 50 टक्के अनुदान देण्यात येईल.
- इतर शेतकऱ्यांना 16 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
हे पण बघा: या योजनेद्वारे महिलांना मिळतील32,000 रुपये
How to Apply for Kadba Kutti Machine Yojana / कडबा कुट्टी मशिन योजनेसाठी अर्ज कसा करावा :
कडबा कुट्टी मशिन योजनेसाठी आपले सरकार केंद्रावर किंवा CSC केंद्रावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा.
Important Dates For Kadba Kutti Machine Yojana / कडबा कुट्टी मशिन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड (Adhar Card)
- बँक पासबुक (Bank Passbook)
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- 7/12 सातबारा उतारा
- 8 अ उतारा
शेतकऱ्यांसाठी ही योजना खूप फायदेशीर आहे त्यामुळे या सरकारी योजनेची माहिती आापल्या सर्व मित्रांना नक्कीच शेअर करा आणि अशाच सरकारी योजनां विषयक माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या.