Join WhatsApp Group

100 Rupees Coin: भारत सरकारने 100 रुपयांचे नाणे जारी करण्याचा घेतला निर्णय, बघा संपूर्ण माहिती.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

100 Rupees Coin: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मन की बात (Mann Ki Bat) हा कार्यक्रम 03 ऑक्टोबर 2014 पासून सुरु झाला आहे. आणि प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी आकाशवाणीवर (रेडिओ) प्रसारित केला जातो. 30 एप्रिल 2023 रोजी रविवारी प्रधानमंत्रींच्या मन कि बात या कार्यक्रमाचा 100 वा भाग (episode) प्रसारित केला जाणार आहे. म्हणून प्रधान मंत्रींच्या मन की बात या कार्यक्रमाच्या 100 व्या भागा निमित्त ₹100 चे नाणे (Coin) जारी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

हे पण पहा: पोलिस प्रशिक्षण जुलै महिन्यात होणार सुरु.

100 Rupees Coin: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या 100 व्या भागा निमित्त जारी करण्यात येणाऱ्या नाण्याचे मूल्य 100 रुपये असणार आहे. स्मरणार्थी नाणी कायदेशीर निविदा मानली जात असली तरी ती सामान्य चलनात जोडली जात नाहीत म्हणजेच सामान्य नागरिकांना हे ₹100 चे नाणे चलनात मिळणार नाही पण निर्दिष्टीत केलेल्या एजन्सी कडून ही नाणी मिळवू शकतात.

हे पण वाचा: राज्यात सलोखा योजना जाहीर.

100 Rupees Coin: स्मरणार्थी ₹100 चे हे नाणे भारतीय अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, हे नाणे गोलाकार असेल, ज्याचा व्यास 44 मिलिमीटर आणि 200 सिरेशन असेल. 35-ग्राम नाण्याची धातूची रचना चतुर्थांश मिश्रधातू असेल, ज्यामध्ये रजत म्हणजेच चांदीचा वाटा 50 टक्के, तांबे 40 टक्के, निकेल 5 टक्के आणि जस्त 5 टक्के असेल. रजत (चांदी), तांबे, निकेल आणि जस्त या चार धातूंपासून हे नाणे बनवले आहे. नाण्याच्या पुढील बाजूस अशोक स्तंभ व त्या खाली ‘सत्यमेव जयते’ असे लिहिलेले आहे. डाव्या बाजूस देवनागरीमध्ये ‘भारत’ तर उजव्या बाजूला इंग्रजीमध्ये ‘India’ असे लिहिलेले आहे. अशा प्रकारचे हे ₹100 चे धातू मिश्रित नाणे असणार आहे.

हे नक्की वाचा: कांदा अनुदान योजनेच्या अर्जास मुदतवाढ.

WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

₹100 Rupees Coin News: 100 रुपयाच्या नाण्याची माहिती आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहिती Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या. लेटेस्ट अपडेट साठी आमचा आपली सर्व्हीस हा WhatsApp ग्रुप जॉईन करा.

हे नक्की वाचा: पुढचे काही दिवस विजांसह पाऊस पडणार.

5/5 - (2 votes)

Leave a Comment