Ropvatika Yojana 2023: शेतकर्यांच्या हितासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनामार्फत अनेक सरकारी योजना राबविल्या जातात जेणेकरून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी त्या सरकारी योजनांचा लाभ व्हावा हा शासनाचा मुख्य उद्देश असतो. राज्य शासनांतर्गत शेतकर्यांना रोपवाटिका म्हणजेच नर्सरी तयार करण्यासाठी पावणेतीन लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. कोणती आहे ती योजना? योजनेसाठी किती अनुदान दिले जाणार आहे? पात्रता काय आहे? आवश्यक कागदपत्रे कोणती? या सर्व बाबींची माहिती आपण पुढे घेणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.
Ropvatika Yojana 2023: राज्यातील शेतकऱ्यांना रोपवाटिका उभारण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना’ या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ₹2 लाख 77 हजारांपर्यंत अनुदान हे शासनातर्फे दिले जाते. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेऊन आपली प्रगत शेतीकडे वाटचाल व्हावी हाच या योजने मागचा उद्देश आहे.
हे पण वाचा: खुशखबर! नविन विहीरीसाठी मिळणार ₹4.00 लाख अनुदान.
Ropvatika Yojana 2023: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना रोपवाटिका उभारणीरिता 1000 चौरस मीटरच्या शेडनेट गृह, पॉलिटनेलसह साहित्य खर्चाच्या 50 टक्के म्हणजेच ₹2 लाख 77 हजार 500 च्या मर्यादेत अनुदान देण्याचे प्रावधान राज्य शासनाने केले आहे.
Eligibility for Ropvatika Yojana 2023 / रोपवाटिका योजनेसाठी पात्रता
- अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- अर्जदार शेतकऱ्याकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र जमीन असावी.
- पाण्याची उपलब्धता असणे आवश्यक आहे.
- खाजगी रोपवाटिकाधारक, राष्ट्रीय कृषी विकास योजना, एकात्मिक फलोत्पादन अभियान, पोकरा किंवा इतर योजनेमधून संरक्षित शेती (शेडनेट व हरितगृह) या बाबीसाठी अनुदान घेतलेले शेतकरी यासाठी पात्र राहणार नाहीत.
- कृषी पदवी/ पदविका धारकांना प्राधान्य.
हे पण बघा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! राज्यात सलोखा योजना जाहीर.
How to Apply for Ropvatika Yojana / रोपवाटिका योजनेसाठी अर्ज कसा करावा.
- रोप वाटिका योजनेचा अर्ज हा महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळ महाडीबीटी (Mahadbt) वर ऑनलाईन अर्ज करू शकतात किंवा
- तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे देखील रोपवाटिका योजनेसाठी अर्ज करू शकतात.
हे पण पहा: कांदा अनुदान अर्जास मुदतवाढ.
Important Documents for Ropvatika Yojana / रोपवाटिका योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे.
- आधार कार्ड
- 7/12 सातबारा उतारा
- 8 अ उतारा
- लागू असल्यास जातीचा दाखला
- बँक पासबुक
WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
संपूर्ण GR पाहण्यासाठी | येथे क्लिक करा . |
राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेची माहिती पोहोचवण्यासाठी आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच सरकारी योजना व शेतीविषयक माहिती मिळवण्यासाठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या. WhatsApp वर लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी कृषी योजना हा WhatsApp ग्रुप जॉईन करा.
हे नक्की वाचा: भारत सरकार ₹100 चे नाणे जारी करणार.
FAQ about Punyashlok Ahilyadevi Holkar Yojana
Q. रोपवाटिकेसाठी कोणती योजना राबवली जाते?
Ans. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना (Punyashlok Ahilyadevi Holkar Ropvatika Yojana)
Q. रोपवाटिका योजनेसाठी किती अनुदान दिले जाते?
Ans. 2 लाख 77 हजार 500 रुपये.
Q. रोपवाटिका योजनेसाठी अर्ज कोठे सादर करावा?
Ans. महाडीबीटी (Mahadbt) वेबसाईटवर किंवा तालुका कृषी अधिकार्यांकडे