Join WhatsApp Group

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे! शेत जमीनीचा बांध कोरणार्‍याला अशी होणार शिक्षा लगेच बघा.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही तुमच्या शेजारील शेतकऱ्यांच्या बांध कोरण्यामुळे त्रस्त असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. तुम्ही तुमच्या शेजारील शेतकऱ्याचे बांध कोरणे कसे बंद करू शकता किंवा त्या बांध कोरणाऱ्या शेतकर्‍यावर कायदेशीर कारवाई कशी करू शकता या सर्व माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

शेत जमिनीत शेती पूर्व मशागत करताना शेतकरऱ्यांच्या नजरचुकीने किंवा जाणूनबुजून शेत जमिनीचा बांध कोरला जातो. त्यामुळे शेजारील-शेजारील शेतकऱ्यांमध्ये वाद होतात. आणि काहीवेळा या वादाचे रूपांतर हाणामारीत पण होते. ते म्हणतात ना जसे “दात कोरून पोट भरत नाही” त्याचप्रमाणे “बांध कोरून उत्पन्न वाढत नाही” कारण जो शेतकरी बांध कोरतो त्याला शेतीत व्यवस्थित उत्पन्न काढता येत नाही कारण तो बांध कोरण्यातच व्यस्त असतो.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे! शेत जमीनीचा बांध कोरणार्‍याला अशी होणार शिक्षा लगेच बघा.

शेत जमिनी विषयक कायदा

सद्य परिस्थितीत महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 हा जमिनीविषयक कायदा उस्तित्वात आहे. याच महसूल कायद्यामध्ये जमिनीच्या सीमा आणि चिन्हे असा विषय आहे. त्यामध्ये शेत जमिनीचा बांध व्यवस्थित ठेवणे आणि न ठेवणे यासंदर्भाचा उल्लेख करण्यात आला आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 ‘सीमा व चिन्हे’ या प्रकरणात शेतीच्या सीमा निश्चित करणे, त्याबद्दलच्या वादाचे निराकरण करणे याबद्दलचा उल्लेख आहे. Punishment will be imposed if the farm land is cut

हे पण नक्की बघा : शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! एक शेतकरी एक डीपी योजना पुन्हा सुरु

शेत जमिनीचा बांध कोरणाऱ्याला काय होणार शिक्षा? | Punishment will be imposed if the farm land is cut

  1. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 या कायद्यात शेत जमिनीच्या बांधासंबंधीचे वाद मिटवण्याची व्यवस्था ही केली आहे.
  2. शेतजमिन बांधाच्या निशाणीला दुखापत करणे किंवा बांध काढून टाकणे असे कृत्य करणाऱ्या व्यक्तींना ₹100 इतका दंड ठोठावण्याची तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कायद्यात केली आहे.
  3. शेत जमिनीचे बांध सांभाळणे व व्यवस्थित ठेवणे ही त्या शेत मालकाची जबाबदारी आहे पण एखाद्याने शेताचा बांध कोरलाच तर त्याची तक्रार तो शेतकरी जिल्हाधिकार्‍यांकडे करू शकतो.
  4. संबंधित जिल्हाधिकारी दोन्ही बाजू ऐकून दोषी वक्तिला शिक्षा करू शकतात.

हे पण नक्की बघा : शेतीला तार कुंपण करण्यासाठी मिळणार 90 टक्के अनुदान

Punishment will be imposed if the farm land is cut ही माहिती शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा.

अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या वेबसाईटला पुन्हा भेट द्या.

4.7/5 - (3 votes)

Leave a Comment