Join WhatsApp Group

Namo Shetkari MahaSanman Yojana: ‘या’ महिन्यांत मिळणार नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Namo Shetkari MahaSanman Yojana: केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेप्रमाणेच महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेचा पहिला हप्ता हा पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबत शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. म्हणजेच आता लाभार्थी शेतकर्‍यांच्या खात्यात दोन हजार रुपयांऐवजी चार हजार रुपये जमा होतील. नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Namo Shetkari MahaSanman Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच PM Kisan Yojana या योजनेप्रमाणेच नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी होणार आहे. राज्य सरकारकडून ही योजना सुरू झाल्यानंतर आता फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजेच केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत 06 हजार रुपये व नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत 06 हजार. असे एकत्रित 12 हजार रूपयांची रक्कम वर्षाकाठी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

हे पण वाचा: या शेतकऱ्यांना मिळणार नाही PM Kisan योजनेचा लाभ.

Namo Shetkari MahaSanman Yojana: महाराष्ट्र राज्याची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनासुद्धा आर्थिक मदत मिळावी, यासाठी नमो शेतकरी महासन्मान योजना राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूरी देण्यात आली आहे.

हे पण बघा: घरबसल्या मोबाईलवर मिळवा ७/१२ सातबारा उतारा.

‘या’ महिन्यांत मिळणार नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता / Namo Shetkari MahaSanman Yojana First Installment

Namo Shetkari MahaSanman Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच दर चार महिन्याला महाराष्ट्र सरकारकडून लाभार्थी शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत 02 हजारांचा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता मे महिन्याच्या शेवटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.

हे पण पहा: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी, खाद्य तेलांच्या किंमती होणार कमी.

WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेची माहिती खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे ही माहिती आपल्या सर्व मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच सरकारी योजनां विषयक माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला फॉलो करा.

हे नक्की वाचा: रेशनकार्ड धारकांसाठी मिळणार खास भेट.

5/5 - (2 votes)

Leave a Comment