Farmers Subsidy for Medicinal Plant Farming : आजकाल सर्वजण आरोग्याच्या समस्यांनी चिंतीत आहेत. यातच तज्ञांनी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा सल्ला दिला आहे. भारतातील आयुष मंत्रालयाने लोकांना रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी औषधी वनस्पतींचा काढा पिण्याचा सल्ला देखील दिला आहे. अशा पद्धतीने औषधी वनस्पतींचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे आणि भविष्यात या औषधी वनस्पतींची खूप गरज भासणार आहे. अशा स्थितीत भारतातील शेतकऱ्यांना औषधी वनस्पतींची लागवड करणे खूप फायदेशीर ठरू शकते.
Farmers Subsidy for Medicinal Plant Farming
भारतात औषधी वनस्पतींच्या शेतीसाठी पुढील प्रमाणे अनुदान देण्यात येते.
NMPB Scheme for Medicinal Plants (NMPB) – ‘मेडिसिनल प्लांट्स बोर्ड’ औषधी वनस्पतींच्या शेतीसाठी शेतक-यांना 75% पर्यंत अनुदान देते.
- 30% अनुदान – उपचारात्मक वनस्पतींच्या 55 प्रजाती ज्यांना मदतीची आवश्यकताआहे.
- 50% अनुदान – गंभीरपणे कमी होत असलेल्या 27 प्रजातींच्या औषधी पिकांची लागवड
- 75% अनुदान – अत्यंत धोक्यात आलेल्या औषधी वनस्पतींच्या 13 प्रजाती.
पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता ह्या तारखेला मिळणार
उच्च उत्पादनासाठी सर्वोत्तम औषधी वनस्पती –
- कोरफड
- आवळा
- अश्वगंधा
- तुळस/तुळशी
- कॅलेंडुला
- दरुहरिद्र
- गुग्गुल
- सफेद मुसळी
भारतातील औषधी वनस्पतींची शेती –
भारतात 15 अँग्रोक्लामॅटिक झोन आहेत आणि 17 हजार ते 18 हजार प्रकारच्या फुलणाऱ्या वनस्पती आहेत ज्यात औषधीय गुणधर्म आहेत. सुमारे 960 प्रकारच्या औषधी वनस्पतींचे व्यापारात मूल्यमापन केले जाते. त्यापैकी 178 प्रजातींचा वार्षिक वापर 100 मेट्रिक टनांपेक्षा जास्त आहे.
हे पण नक्की बघा : मुख्यमंत्री फेलोशिप भरती 2023