Join WhatsApp Group

Agriculture News: अवकाळीग्रस्त शेतकर्‍यांसाठी महत्त्वाची बातमी, 10 दिवसात सरकारकडून मदतीची घोषणा.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Agriculture News: नमस्कार शेतकरी बांधवांनो, भारत हा कृषी प्रधान देश आहे त्यामुळे भारतातील निम्म्याहून अधिक लोक शेती व्यवसाय करतात. पण सध्या वातावरणात होणाऱ्या अचानक बदलामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर शेती पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आणि त्यातल्या त्यात शेतकऱ्यांना सरकार कडून नुकसान भरपाई पण वेळेवर मिळत नाही या सर्व कारणांमुळे शेतकरी खूप संकटात सापडत आहेत. महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अवकाळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून येत्या 10 दिवसात मदत करण्याची घोषणा केली आहे.

हे पण बघा: तरुणांना व्यवसायासाठी मिळणार 50 लाख रुपये.

Agriculture News: महाराष्ट्रातील अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुढील येणाऱ्या 10 दिवसांत आर्थिक मदत मिळवून देण्याची घोषणा ही कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. तर अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांना शासन कशाप्रकारे मदत करणार आहे याची माहिती आपण पुढे बघणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.

हे पण वाचा: शेतकऱ्यांना सर्वात जास्त फायदा मिळवून देणाऱ्या योजना.

Agriculture News: महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अवकाळी पावसाने आणि गारपीटीमुळे शेत पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफ (NDRF) जाहिर केलेल्या निकषांपेक्षा अधिक आर्थिक मदत म्हणजेच नुकसान भरपाई ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील 43 हजार हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे आणि आतापर्यंत फक्त 70 टक्केच शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून येणाऱ्या एक दोन दिवसांत उर्वरीत पंचनामे पूर्ण करून. येणाऱ्या पुढील 10 दिवसांत शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची घोषणा होईल, असेही कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

हे नक्की बघा: घरबसल्या बघा आपल्या शेत जमिनीचा नकाशा फक्त दोन मिनिटांत.

WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकऱ्यांसाठी ही बातमी खुप महत्त्वाची आहे त्यामुळे ही बातमी आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच शेतीविषयक बातम्या आणि सरकारी योजनां विषयक माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या.

हे पण वाचा: शेतकरी मुलाशी लग्न करणाऱ्या मुलीला मिळणार 2 लाख रुपये.

5/5 - (2 votes)

Leave a Comment