Join WhatsApp Group

Farm Land Map on Mobile : घरच्या घरी बघा आपल्या शेत जमिनीचा नकाशा फक्त दोन मिनिटांत मोबाईलवर.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Farm Land Map on Mobile : नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या लेखात आपण शेत जमिनीचा नकाशा घरबसल्या मोबाईलवर कसा बघायचा याची माहिती घेणार आहोत. मित्रांनो 7/12 सातबारा उताऱ्या प्रमाणेच मोबाईलवर दोन ते पाच मिनिटांत तुमच्या शेत जमिनीचा नकाशा बघू शकतात. त्या नकाशात कोणता रस्ता तुमच्या शेत जमिनीतुन गेला आहे. तसेच तुमच्या जमिनीचा सर्व नकाशा बघण्यासाठी तुम्हाला तलाठी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही आता तुम्ही तुमच्या मोबाईलवर घरच्या घरी तुमच्या शेत जमिनीचा नकाशा बघू शकता. शेत जमिनीचा नकाशा कसा बघावा? (How to view a map of farm land) हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Farm Land Map on Mobile

Farm Land Map on Mobile : शेतकऱ्यांना आपल्या शेत जमिनीचा नकाशा घरबसल्या आपल्या मोबाईलवर बघता यावा म्हणून शासनाने ई-नकाशा (E-Map) प्रणाली आणली आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या गावाचा, शेत जमिनीचा नकाशा, जमिनीच्या हद्दी तसेच शेतरस्ता इत्यादी बाबी पाहू शकता.

हे पण बघा: मोबाईलद्वारे करा शेत जमिनीची मोजणी.

Follow the steps below to view the farm land map / शेतजमिनीचा नकाशा पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

  1. https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/ सर्वप्रथम महाभूमी च्या अधिकृत वेबसाईटवर जावे.
  2. महाभूमी च्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्या डाव्या बाजूने असणाऱ्या तीन रेषांवर क्लिक करा.
  3. नंतर राज्य सिलेक्ट करा
  4. नंतर ग्रामीण आणि शहरी यांपैकी तुम्ही ज्या क्षेत्रात येतात ते क्षेत्र निवडा.
  5. नंतर जिल्हा आणि तालुका निवडा.
  6. नंतर तुमची शेतजमिन ज्या गावाच्या हद्दीत येते ते गाव निवडा.
  7. नंतर खाली तुमच्या शेत जमिनीचा गट नंबर निवडा किंवा टाका. आणि सर्च वर क्लिक करावे.
  8. तुमच्या मोबाईल स्क्रीनवर Plot Info आणि Map Report असे पर्याय दिसत असणार.
  9. Map Report वर क्लिक करावे.
  10. Map Report वर क्लिक केल्यानंतर Open वर क्लिक करून तुमच्या शेत जमिनीच्या नकाशाची PDF फाइल डाऊनलोड होईल. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शेत जमिनीचा नकाशा मोबाइलवर बघू शकता.
WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकऱ्यांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे ही माहिती आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच शेतीविषयक आणि सरकारी योजनांविषयक उपयुक्त माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या.

हे पण वाचा: शेतकऱ्यांसाठी सर्वात जास्त फायद्याच्या 05 योजना.

5/5 - (2 votes)

Leave a Comment