CMEGP SCHEME: Chief Minister Employment Program (CMEGP) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्र सरकार तरुणांसाठी उद्योग व्यवसायांच्या संधी निर्माण करत आहे. राज्य शासन महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार संधी निर्माण व्हाव्यात म्हणून वेगवेगळ्या योजना कार्यक्रम राबवत असते त्यातीलच एक योजना म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP-SCHEME). काय आहे CMEGP योजना? CMEGP योजनेचा तरुणांना काय फायदा होणार? CMEGP योजनेद्वारे किती कर्ज मिळणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी Mukhyamantri Rojgar Nirmiti Yojana हा लेख शेवटपर्यंत वाचा.
CMEGP: महाराष्ट्र राज्यातील बर्याचशा कुटुंबामध्ये कुटुंबाची जबाबदारी ही त्या कुटुंबातील तरुणांवर परंतु त्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार नौकरी मिळत नाही. त्यामुळे ते सुशिक्षित बेरोजगार आहेत. परंतु यातील बऱ्याच तरुणांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करायचा असतो पण भांडवल नसल्यामुळे स्वतःचा व्यवसाय सुरु करता येत नाही. यांवर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने सुशिक्षित तरुणांना स्वतः चा व्यवसाय सुरू करता यावा या उद्देशासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना कार्यक्रम सुरु केला आहे. ज्यामुळे महाराष्ट्र राज्यातील तरुणांना स्वतःचा लघु व्यवसाय सुरु करून स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतील आणि राज्यात रोजगाराच्या नवीन संधी तयार करून राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण थोड्याफार प्रमाणात कमी होईल. (Chief Minister Employment Program (CMEGP))
हे नक्की वाचा: प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना मिळवा 35 टक्के अनुदान
CMEGP: महाराष्ट्र राज्यातील तरुण आणि तरुणींना स्वतःचा व्यवसाय सुरु करून आत्मनिर्भर होता यावे. यासाठी जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामउद्योग मंडळातर्फे Mukhyamantri Rojgar Nirmiti Yojana राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत महिलांना 30 टक्के आरक्षण दिले जाते.
Eligibility for CMEGP Scheme 2023 / मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी पात्रता.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी खालील प्रमाणे पात्रता आवश्यक आहे.
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- अर्जदाराचे वय 18 ते 45 वर्षे असावे
- मागासवर्गीयांसाठी 18 ते 50 वर्षे
- अर्जदार कमीत कमी 07 वी उत्तीर्ण असावा.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत पुढीलप्रमाणे अनुदान देण्यात येते (CMEGP SUBSIDY)
- शहरी भागातील अर्जदारांना उभारलेल्या प्रकल्पाच्या 25 टक्के अनुदान दिले जाते.
- ग्रामीण भागातील अर्जदारांना उभारलेल्या प्रकल्पाच्या 35 टक्के अनुदान दिले जाते.
How to Apply for CMEGP Scheme / मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी अर्ज कसा करावा
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी (CMEGP Yojana) खालीलप्रमाणे अर्ज करावा.
- मुख्यमंत्री रोजगार निर्मितीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CMEGP पोर्टल विकसित करण्यात आले आहे.
- कर्ज मागणी प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्रास किंवा खादी व ग्रामोद्योग मंडळ (KVIB) संस्थेस सादर करण्यात येतील.
हे पण बघा: घरकामगार महिलांना मिळतील 10 हजार रुपये.
Important Documents for CMEGP Scheme / मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्डराशन कार्ड
- रहिवाशी प्रमाणपत्र
- डोमिसाईल प्रमाणपत्र
- पॅन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- अर्जदार अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- बँकेचे पासबुक
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- अर्जदाराने REDP / EDP / SDP किंवा कौशल्य विकास प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्रअर्जदार जो व्यवसाय सुरु करणार आहे त्या व्यवसायाचा प्रकल्प अहवालहमीपत्र
WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
तरुणांसाठी ही Mukhyamantri Rojgar Nirmiti Yojana अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे या योजनेची माहिती आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच सरकारी योजनांविषयक माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या.