Join WhatsApp Group

Sarkari Yojananchi Jatra : खुशखबर! आता प्रत्येक जिल्ह्यात भरणार शासकिय योजनांची जत्रा, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Sarkari Yojananchi Jatra : महाराष्ट्र राज्यातील नागरिकांच्या सोयी – सुविधेसाठी महाराष्ट्र शासनातर्फे विविध सरकारी योजना राबविल्या जातात. पण या सरकारी योजनांची माहिती सर्वच नागरिकांपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे बरेच पात्र नागरिक या योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहेत. त्यामुळेच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जनकल्याण अभियानांतर्गत राज्यभर ‘जत्रा शासकीय योजनांची – सर्व सामान्यांच्या विकासाची’ हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. जत्रा शासकिय योजनांची हा काय उपक्रम आहे? याची माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

हे पण वाचा: शेतकऱ्यांच्या फायद्याच्या पाच सरकारी योजना.

Sarkari Yojananchi Jatra : जत्रा शासकिय योजनांची हा कार्यक्रम समन्वय मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत दिनांक 15 एप्रिल 2023 ते दिनांक 15 जून 2023 या कालावधीत राबविला जाणार आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत. शासकिय योजनांची जत्रा या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी तालुका आणि जिल्हास्तरावर जनकल्याण कक्ष स्थापन करतील. या कार्यक्रमाच्या कालावधीत नागरिकांना विविध योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज भरून घेण्यात येतील.

हे नक्की वाचा: रेशन कार्डधारकांसाठी मोदी सरकारची खास सुविधा.

Sarkari Yojananchi Jatra : जत्रा शासकिय योजनांची या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 75 हजार लाभार्थ्यांना सरकारी योजनांचा थेट लाभ दिला जाणार आहे. मंत्रालयीन स्तरावरील सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या व राज्यशासनाच्या योजनांचा आढावा घ्यावा व या उपक्रमांतर्गत राबवावयाच्या योजनांचे जिल्हानिहाय उद्दिष्ट ठरवावे. ठरवून दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत स्वयंस्पष्ट सूचना दिनांक 17 एप्रिल 2023 पर्यंत निर्गमित कराव्यात.

हे पण वाचा : शेतकऱ्यांसाठी सरकारचा दिलासादायक निर्णय.

SARKARI YOJANANCHI JATRA
जत्रा शासकिय योजनांची या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे?
  1. तळगाळातील पात्र लाभार्थींपर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी शासकीय योजनांची जत्रा उपक्रम राबविला जाणार आहे.
  2. शेवटच्या गरजू लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करावं. प्रत्येक यंत्रणेचा या जत्रेमध्ये सहभाग राहणार आहे.
  3. यंत्रणेने या जत्रेच्या दृष्टीने काम करत असलेल्या कामांचा अहवाल जिल्हा जनकल्याण कक्षाला दररोज सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
  4. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षांनिमित्त 36 विभागामार्फत 75 शासकीय योजनांची माहिती आणि लाभ प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजार लाभार्थीना देण्यात येणार आहे.

हे नक्की वाचा: अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी.

Sarkari Yojananchi Jatra : खुशखबर! आता प्रत्येक जिल्ह्यात भरणार शासकिय योजनांची जत्रा, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांसाठी ही माहिती महत्त्वाची आहे त्यामुळे ही महत्त्वाची माहिती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. आणि अशाच सरकारी योजनां विषयक माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला नक्कीच भेट द्या.

हे नक्की वाचा: शेतीपूरक 05 व्यवसाय जे शेतकऱ्यांना बनवतील मालदार.

5/5 - (2 votes)

Leave a Comment