Join WhatsApp Group

Sarkari Yojana : एका मुलीनंतर कुटूंब नियोजन केल्यास मिळणार 50 हजार रुपये वाचा काय आहे योजना.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Mazi Kanya Bhagyashree Yojana : महाराष्ट्र शासन मुलींची संख्या, मुलींचे जीवनमान आणि शिक्षण उंचवण्यासाठी विविध योजना राबवित असते. त्यातीलच एक योजना म्हणजे ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना ही योजना 01 एप्रिल 2016 पासून राबविली जात आहे. एक किंवा दोन मुली झाल्यानंतर ज्यांनी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येतो. काव आहे माझी कन्या भाग्यश्री योजना? फायदे काय आहेत? पात्रता काय आहे? या सर्व गोष्टींची माहिती आपण पुढे बघणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.

हे पण वाचा: 10वी, 12वी चा निकाल या दिवशी लागणार.

Mazi Kanya Bhagyashree Yojana :

माझी कन्या भाग्यश्री योजनेमुळे मुलींचे जीवनमान आणि शिक्षणातील प्रगती उंचवण्यासाठी मदत होणार आहे. शिवाय या योजनेमुळे स्त्रीयांची संख्या वाढण्यासही मदत होईल. माझी कन्या भाग्यश्री योजनेला चालना देण्यासाठी शासनाने आता कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ₹07 लाख 50 हजार इतकी करण्यात आली आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजनेचे फायदे :

शासनातर्फे माझी कन्या भाग्यश्री योजनेद्वारे लाभार्थ्यास पुढीलप्रमाणे लाभ दिला जातो.

 1. एका मुलीच्या जन्मानंतर जर नसबंदी केली तर शासनातर्फे ₹50 हजार लाभ दिला जातो.
 2. दोन मुलींच्या जन्मानंतर जर नसबंदी केली ता शासनातर्फे दोन्ही मुलींना प्रत्येक ₹25-25 हजार लाभ देण्यात येतो.
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी आवश्यक पात्रता :

या योजनेसाठी खालील अटी पूर्ण करणारे अर्जदार पात्र असतील.

 1. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
 2. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 07 लाख 50 हजार रुपयांपेक्षा अधिक नसावे.
 3. एक किंवा दोन मुलीं आपत्य असणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येतो.
 4. माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या लाभासाठी मुलींच्या जन्मानंतर दोन वर्षाच्या आतच पालकांना नसबंदी करावी लागेल.

नक्की वाचा : घरकामगार महिलांना मिळणार 10 हजार रुपये.

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील कागदपत्र आवश्यक आहेत.

 1. आधार कार्ड
 2. रहिवासी दाखला
 3. उत्त्पन्नाचा दाखला
 4. आईचे किंवा मुलीचे बँक पासबुक
 5. पासपोर्ट साइज फोटो
WhatsApp वर माहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

ही माहिती सामान्य जनतेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे ही माहिती आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच सरकारी योजनां विषयक माहितीसाठी www.aapliservice.com या वेबसाईटला भेट द्या.

5/5 - (2 votes)

Leave a Comment