Join WhatsApp Group

Agri Business : शेतकऱ्यांनो! हे 07 शेतीपूरक व्यवसाय करून महिन्याला कमवा बक्कळ पैसा

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Agri Business : अवकाळी पावसामुळे किंवा निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकरी त्रस्त आहे. शिवाय पिकांवरील रोग,शेतीचा वन्य प्राण्यांद्वारे विध्वंस यांमुळे शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची हमी नसते. म्हणून शेतकऱ्यांसाठी आजच्या लेखात 07 शेतीपूरक व्यवसायांची (Agriculture Business ) माहिती देणार आहे. या शेतीपूरक व्यवसायांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास नक्की मदत होईल. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

हे पण नक्की वाचा : एका मुलीच्या जन्मानंतर मिळणार 50 हजार रुपये

Agri Business : शेतीपूरक व्यवसाय

1. गांडूळ खत निर्मिती (Vermicompost) :

शेतकरी आता सेंद्रिय शेती करण्यावर भर देत आहे. सेंद्रीय शेतीसाठी गांडूळ खत एक उत्तम खाद्य आहे. गांडूळ खतामुळे शेतीतील उत्पन्न वाढण्यास मदत होते. त्यामुळे आजकाल गांडूळ खताला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. म्हणजेच तुम्ही गांडूळ खत विकून बक्कळ पैसा कमावू शकता. शिवाय गांडूळ खताचा वापर आपल्या शेतीमध्ये करून आपले उत्पन्न पण वाढवू शकतात.

2. जनावरांसाठी चारा निर्मिती (Fodder production) :

शेतीपूरक व्यवसायामध्ये चारा निर्मिती व्यवसाय हा एक फायदेशीर असा व्यवसाय ठरू शकतो. यात तुम्ही तुमच्या शेतातील कोरडा चारा साठवून ठेवणे यामध्ये ज्वारीचा कडबा कुटी करून १०० किलो बॅग भरून विक्री करू शकता. शहराजवळच्या जनावरांना चारा पुरवून तुम्ही पैसे कमवू शकता. शहरात काही ठिकाणी ओला,सुका,चारा दररोज विकला जातो.

3. मधुमक्षिका पालन (Beekeeping) :

मधाची मोठ्या प्रमाणावर असणारी मागणी बघता शेतकऱ्यांसाठी मधमाशी पालन हा व्यवसाय खूपच फायदेशीर ठरू शकतो. कारण मधमाशी पालन व्यवसायामुळे तुम्ही दोन मोठे फायदे घेऊ शकता. 1)मध विकून पैसे कमवू शकता. आणि 2)मधमाशांच्या परागीभवणा मुळे तुम्ही तुमच्या शेतीचे उत्पन्न दुप्पट करु शकता.

4. कोंबडी पालन (Poultry Farming) :

कुक्कुट पालन किंवा कोंबडी पालन हा व्यवसाय फार पूर्वीपासून चालत आलेला आहे. कोंबडी पालन व्यवसाय हा सहजपणे कोणीही करू शकतो. या व्यवसायामध्ये तुम्ही कोंबड्यांच्या अंड्यां सोबत मांसाचे उत्पादन घेऊ शकता.

5. शेळी पालन (Goat Farming) :

शेळी पालन अथवा बकरी पालन हा एक शेतीपूरक व्यवसाय आहे. शेळी पालन व्यवसाय आता खूप फायदेशीर ठरत आहे. शेळ्यांना गायी आणि म्हशींना पेक्षा खूपच कमी प्रमाणात चारा लागतो. शेळी पालन अल्प खर्चात करता येऊ शकते. शेळीपालन व्यवसायात तुम्ही दोन फायदे घेऊ शकतात. 1)मांसासाठी शेळी विकूण 2)शेळ्यांपासून मिळणाऱ्या लेंडी खताचा शेतात वापर करून.

नक्की वाचा: 10वी, 12वी निकालाच्या तारखा जाहीर.

6. मशरूम शेती (Mushroom Farming) :

मशरूम शेती किंवा आळिंबी शेती. आजकाल लोकांची मशरूम खाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी केली जात आहे. त्यामुळे शेतकरी मशरूम शेती करून महिना बक्कळ नफा मिळवू शकतात.

7. खेकडा पालन (Crab Farming) :

खेकडा पालन हा एक नविन शेतीपूरक व्यवसाय म्हणून उदयास आला आहे. या व्यवसायात तुम्ही कमी जागेत खेकडा पालन व्यवसाय करून. बक्कळ आर्थिक नफा मिळवू शकतात. कारण बाजारात खेकड्यांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे.

WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
या शेतीपूरक व्यवसायांची ( Agribusiness ) माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच माहिती साठी www.aapliservice.com या वेबसाईटला भेट द्या.
5/5 - (1 vote)

Leave a Comment