Join WhatsApp Group

पेरू लागवड करा आणि वर्षभर चांगले व स्थिर उत्पन्न मिळवा | Peru Lagvad Mahiti

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Peru Lagvad Mahiti: भारतातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या ही शेतीव्यवसाय करतात. त्यामुळेच भारत देशाला कृषी प्रधान देश म्हणून ओळखले जाते. पण शेतऱ्यांच्या पिक मालाला योग्य भाव मिळत नाही किंवा स्थिर भाव मिळत नाही. त्यामुळे भारतीय शेतकरी चिंतेत असतो. तर शेतकरी बांधवांनो आजच्या या लेखात आपण वर्षभर स्थिर आणि योग्य भाव मिळणाऱ्या पेरु या फळपिका विषयी माहिती बघणार आहोत, त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्कीच वाचा.

Peru Lagvad Mahiti: गरीब माणसांचे सफरचंद म्हणून पेरूला ओळखले जाते. भारतातील काही शेतकरी तैवानच्या गुलाबी पेरु या जातीची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. तैवान गुलाबी पेरूमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते, शुगर कमी असते, स्टार्च कमी असतो, बिया कमी असतात किंवा बियाही नसतात. तैवान गुलाबी पेरू हा रस तयार करण्यासाठी सर्वोत्तम आहे. या पेरुची चव स्ट्रॉबेरी व नाशपातीच्या मिश्रणासारखी आहे. त्यामुळे तैवान जातीच्या या पेरूला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

हे पण वाचा: रोपवाटिका उभारण्यासाठी मिळणार अनुदान.

Peru Lagvad Mahiti: तैवान गुलाबी पेरुची लागवड पद्धत.

तैवान गुलाबी पेरूची लागवड ही सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते. तैवान गुलाबी पेरूची लागवडीच्या तीन पद्धती आहेत.

  1. सामान्य लागवड पद्घत या पद्धतीत पेरूच्या झाडांमध्ये 15×15 असे अंतर ठेवले जाते.
  2. दाट लागवड पद्धत या पद्धतीत पेरूच्या झाडांमध्ये 5×5 इतके अंतर ठेवले जाते.
  3. अतिशय दाट लागवड पद्धत या पद्धतीमध्ये पेरूच्या झाडांमध्ये 3×6 इतके कमी अंतर ठेवले जाते.

हे पण बघा: विहिरीसाठी मिळणार 4.00 लाख रुपये अनुदान.

पेरू लागवड कशी करावी?

  1. 20×20 सेमी रुंद व खोल खड्डे खणून खड्ड्यांवर सुमारे 50 ग्रॅम लिंबाची पूड टाका.
  2. नंतर त्या प्रत्येक खड्ड्यांमध्ये 1.5 किलो कंपोस्ट गांडुळ खत घाला.
  3. आता पेरूची रोपे लावा आणि खड्डा मातीने झाकून टाका.
WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकऱ्यांसाठी ही माहिती अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे ही माहिती आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच शेती विषयक उपयुक्त माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या. सरकारी योजना व शेती विषयक माहितीच्या लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी वरती दिलेल्या कृषी योजना या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा.

हे नक्की वाचा: राज्यात सलोखा योजना जाहिर.

3/5 - (2 votes)

Leave a Comment