Kukut Palan Yojana : एकात्मिक कुकुट विकास या योजने अंतर्गत 50 टक्के अनुदानावर अंडी उत्पादनासाठी वाटप करण्यात येणाऱ्या तलंगा, कोंबडे व एक दिवसीय कोंबडीचे पिल्ले यांच्यासाठी देण्यात येणाऱ्या आधारभूत अनुदानात वाढ करून देण्यात येणार आहे. ह्या योजनेतील अनुदानात होणारी वाढ ही 01/04/2023 पासून अंमलात येईल.
कुक्कुट पालन योजना | Kukut Palan Yojana
एकात्मिक कुक्कुट विकास योजना राज्यात 2010 पासून अंमलात आली आहे. ह्या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदानावर पुढील प्रमाणे लाभ देण्यात येत होता.
1. अंडी उत्पादनासाठी 25 कोंबड्या आणि 3 नर कोंबडे व
2. एक दिवसीय 100 कोंबडीचे पिल्ले
महागाईच्या काळात कुकुट पालनासाठी येणाऱ्या खर्चात खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे कुकुट पालनासाठी देण्यात येणाऱ्या 50 टक्के अनुदानात वाढ करण्यात आली आहे आणि ही दरवाढ 01/04/2023 पासून लागू करण्यात येणार आहे.
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण एकात्मिक कुक्कुट विकास या योजनेअंतर्गत 50 टक्के अनुदानावर अंडी उत्पादनासाठी वाटप करावयाच्या तलंगा आणि नर कोंबडे व एक दिवशीय कुक्कुट पक्षी यांच्या आधारभूत किंमतीत पुढील प्रमाणे सुधारणा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
क्र. | तलंगा गट | यापूर्वीचे दर | सुधारीत दर |
1. | 25 कोबड्या + 3 नर | ₹6000/- | ₹10840/- |
2. | एकदिवसीय कोंबडीचे पिल्ले | ₹16000/- | ₹29500/- |
वरील प्रमाणे सुधारीत दर म्हणजेच देण्यात येणारे अनुदान हे आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये अर्थसंकल्पित होणाऱ्या निधीतून हे अनुदान देण्यात येत असून 01-04-2023 पासून अंमलात येईल.
सदरील शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर अपलोड केला आहे. सदरील शासन निर्णय डिजीटल सही ने साक्षांकित करून 20 जानेवारी 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
शासन निर्णय क्रमांक :
कुक्कुट – 2022/प्र.क्र.28/पदुम-4
कुक्कुट पालनाच्या ह्या योजनेच्या अनुदानातील वाढीचा लाभ 01 एप्रिल 2023 पासून घेऊ शकतात.