Join WhatsApp Group

Falbag Lagwad Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! फळबाग लागवडीसाठी सरकार देणार 90 टक्के अनुदान

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Falbag Lagwad Yojana : शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. फळबागांच्या लागवडीसाठी राज्य शासनाने 01 कोटी 68 लाखांचे बजेट मंजूर केले. काय व कशी आहे फळबाग लागवड योजना? फळबाग लागवड योजनेसाठी किती अनुदान मिळणार? फळबाग योजनेसाठी कोण पात्र आहेत? इत्यादी माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Falbag Lagwad Yojana : ज्या शेतकरी बांधवांना फळबाग लागवड करायची त्या शेतकऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2022-2023 या आर्थिक वर्षात फळबाग लागवड योजनेच्या अंमलबजावणीसाठी हा निधी अनुसूचित जाती (SC) साठी राहणार आहे.

हे वाचा : मागेल त्याला मिळणार शेततळे शेतकऱ्यांना मिळणार 90 टक्के अनुदान

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana :

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना २०१८-१९ पासून सुरु करण्यात आली आहे.
या योजनेत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना मंजूर अनुदान पहिल्या वर्षी 50 टक्के, दुसऱ्या वर्षी 30 टक्के आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के अश्या टप्प्यात तीन वर्षात लाभ देण्यात येणार असून लाभार्थी शेतकऱ्याने दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण बागायती झाडांसाठी 90 टक्के तर कोरडवाहू झाडांसाठी 80 टक्के असणे गरजेचे आहे. हे प्रमाण जर कमी झाल्यास शेतकऱ्याने स्वखर्चाने झाडे आणून पुन्हा जिवंत झाडांचे प्रमाण विहित केल्याप्रमाणे राखणे गरजेचे आहे. अश्याप्रकारे शेतकऱ्याला 90 टक्के अनुदान 3 वर्ष्यात फळबाग लागवडीवर मिळणार आहे .
अल्प, अत्यल्प भूधारक, महिला आणि दिव्यांग शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य दिले गेलेलेआहे.

Falbag Lagwad Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! फळबाग लागवडीसाठी सरकार देणार 90 टक्के अनुदान

हे वाचा : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पाईप लाईनसाठी मिळणार 50 टक्के अनुदान

Eligibility Criteria for Falbag Lagwad Yojana : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता व कागदपत्रे :

  1. लाभार्थ्यास फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन संच बसविणे आवश्यक आहे.
  2. सर्व प्रवर्गाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल व त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचा विचार करण्यात येईल. (कुटुंबाची व्याख्या: पती, पत्नी, व अज्ञात मुले)
  3. लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देय आहे. संस्थात्मक लाभार्थांना लय योजनेचा लाभ देय नाही.
  4. अर्जदार शेतकऱ्यास स्वतःच्या नावावर ७/१२ असणे गरजेचे आहे. संयुक्त मालकी असल्यास इतर खातेदारांच्या संमतीने शेतकऱ्यास स्वतःच्या जमिनीच्या मर्यादेत लाभ घेता येईल.
  5. सातबारा वर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती असणे आवश्यक आहे.
  6. परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता)अधिनियम 2006 नुसार वनपट्टे धारक शेतकरी लाभ घेण्यास पात्र आहेत.
  7. इतर शासकीय योजनेतून फळबाग लागवड केली असल्यास ते क्षेत्र वगळून वरील विभागानुसारच्या क्षेत्र मर्यादेत शेतकऱ्यास लाभ घेता येईल.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन 2022-23 GR बघण्यासाठी

Falbag Lagwad Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! फळबाग लागवडीसाठी सरकार देणार 90 टक्के अनुदान

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा (Falbag Lagwad Yojana) लाभ घेण्यासाठी महाडीबीटी (Mahadbt) पोर्टल ला भेट द्या किंवा जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क करा. अश्याच नवनवीन सरकारी योजनेच्या माहितीसाठी आमच्या www.aapliservice.com या वेबसाईटला भेट द्या.

ही माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या मित्रांना शेयर करा.


सरकारी योजना

ShetTale YojanaClick Here
Pradhan Mantri Kisan Maan Dhan YojanaClick Here
Namo Shetkari Maha Samman Nidhi YojanaClick Here
Lek Ladki YojanaClick Here
PMEGP YojanaClick Here
Shetkari Apghat Vima Yojana Click Here
50 Hajar Anudan YojanaClick Here
Rate this post

Leave a Comment