Join WhatsApp Group

Document Recover: शैक्षणिक गुणपत्र किंवा प्रमाणपत्र हरवल्यास परत मिळवण्यासाठी काय करावे? बघा येथे संपूर्ण माहिती.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Educational Marksheet Certificate Recover: नमस्कार मित्रांनो, आजकाल शिक्षणासाठी जी स्पर्धा चालू आहे ते बघता आपले शैक्षणिक प्रमाणपत्र किंवा इतर कागदपत्रे किती महत्त्वाचे आहेत हे समजते. आपण त्या गुणपत्रकांना आणि प्रमाणपत्रांना आपल्या जीवापेक्षाही जास्त जपतो. पण जर ती शैक्षणिक प्रमाणपत्र अनपेक्षितपणे हरवली, किंवा इतर कोणत्याही कारणाने खराब झाले तर काय करावे? हरवलेले शैक्षणिक प्रमाणपत्र परत कसे मिळवावे? शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या प्रती प्राप्त करण्यासाठी काय करावे? या सर्व बाबींची रीतसर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

How to recover lost educational certificate? / हरवलेली शैक्षणिक प्रमाणपत्र परत कसे मिळवावे?

हरवलेले शैक्षणिक प्रमाणपत्र पुढील पद्धतीने परत एकदा मिळवू शकता.

  • सर्वप्रथम संबंधित व्यक्तिने सर्व आवश्यक माहितीसह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी.
  • शैक्षणिक प्रमाणपत्र हरवल्याची बातमी सोशल मीडिया (WhatsApp, Facebook, Instagram) आणि वर्तमानपत्रात द्यावी.
  • एव्हढे करूनही तुमचे शैक्षणिक प्रमाणपत्र मिळाले नाहीतर तर मग पोलीस ठाण्यातून शैक्षणिक प्रमाणपत्र सापडले नाही याची पावती घ्यावी.
  • नंतर मग तुमच्या स्थानिक तहसिलदाराला पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली पावती द्यावी आणि तुमचे शैक्षणिक प्रमाणपत्र हरवले आहे याची पुष्टी करणारे प्रमाणत्र किंवा पावती तहसिलदाराकडून घ्यावी.

हे पण वाचा: HSC SSC Result Date

हरवलेल्या शैक्षणिक प्रमाणपत्राचे डुप्लिकेट प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पुढील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

  • सर्वप्रथम डुप्लिकेट प्रमापत्रासाठीचा अर्ज तुम्ही ज्या शाळेत शिकलात त्या शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवावा.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडवीत त्यात पोलीसांनी दिलेली पावती, तहसिलदाराने दिलेले प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे. शिवाय बँकेचा डिमांड ड्राफ्ट आवश्यक आहे.
  • जिल्हा शिक्षणाधिकारी अर्जाची खात्री करतील आणि डुप्लिकेट प्रमाणपत्र देण्यासाठी पुढील कार्रवाई करण्याचे आदेश देतील.
  • नंतर शालेय शिक्षण परीक्षा संचालकाकडून तुम्हाल 03 महिन्याच्या आत डुप्लिकेट शैक्षणिक प्रमाणपत्र किंवा गुणपत्र तुम्ही ज्या ठिकाणाहून अर्ज केला असेल तेथे पाठविले जातील.

जरी हरवलेले शैक्षणिक प्रमाणपत्र परत मिळत असले तरी त्यासाठीची अर्जप्रक्रिया खूप किचकट आहे. त्यामुळे आपली शैक्षणिक कागदपत्रे जास्तीत जास्त सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करा.

WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

सर्व नागरिकांसाठी ही अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे. त्यामुळे ही माहिती आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या.

नक्की वाचा: या योजनांसाठी आधार आणि पॅन कार्ड अनिवार्य.

5/5 - (2 votes)

Leave a Comment