Join WhatsApp Group

Agriculture Drone : शेतात ड्रोन वापरण्यासाठी शासनाकडून घ्यावी लागते परवानगी | संपूर्ण माहिती वाचा

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Agriculture Drone : भारत हा कृषी प्रधान देश आहे त्यामुळे भारतीय शेतकरी आता आधुनिक शेतीकडे वळत आहेत. त्यातच आता कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर हा वाढत आहे. ड्रोन च्या सहाय्याने शेती करण्यासाठी भारतीय शेतकरी हे खूप उत्सुक आहेत. पण मात्र ड्रोन हे हवेतून उडणारे वाहन असल्यामुळे त्याच्या वापरासाठी शासनाकडून काही परवानग्या आणि परवाना घेणे आवश्यक असते.

मित्रांनो आपण या लेखात ड्रोनच्या प्रारूपाची(Model) नोंदणी, त्याच्या प्रत्यक्ष वापरासाठी नोंदणी, ड्रोन चालविण्याचा परवाना (License), ड्रोन हवेत उडवायला परवानगी असलेले हवाई क्षेत्र इ. बाबींविषयी माहिती घेऊ.

Agriculture Drone

1. Type Certificate (टाइप प्रमाणपत्र)

रस्त्यावरून चालणारी विविध प्रकारची वाहने प्रत्यक्ष वापरकर्त्याला उपलब्ध करून देण्यापूर्वी त्याचे प्रारूप (model) हे परिवहन विभागाकडून प्रमाणित करून घ्यावे लागते. या तपासणीमध्ये ते वाहन प्रारूप त्यासाठी आवश्यक त्या गोष्टी पूर्ण करते की नाही, हे बघितले जाते.

त्याचप्रमाणे ड्रोनचे मॉडेल प्रत्यक्ष वापरण्यात आणण्यापूर्वी DGCA-Directorate General of Civil Aviation (नागरी विमान महानिर्देशनालय) द्वारे प्रमाणित असणे किंवा करून घेणे आवश्यक असते.

ते प्रमाणित केल्यानंतर DGCA (डीजीसीए) किंवा त्यांनी अधिकृत केलेली संस्था त्या मॉडेलसाठी प्रमाणपत्र प्रदान करते. त्यालाच टाइप सर्टिफिकेट (Type Certificate) असे म्हटले जाते.

ड्रोन खरेदी करत असताना ड्रोनचे मॉडेल हे DGCA द्वारे Type Certificate प्रदान केलेले आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी. ड्रोनची खात्री करण्यासाठी DGCA ची वेबसाइट पुढे दिलेली आहे.

Agriculture Drone : शेतात ड्रोन वापरण्यासाठी शासनाकडून घ्यावी लागते परवानगी | संपूर्ण माहिती वाचा

👉कृषी ड्रोन घेण्यासाठी मिळणार 50% ते 75% अनुदान👈

कोणत्या ड्रोनसाठी Type Certificate ची गरज नाही?

नॅनो (अतिसूक्ष्म) ड्रोनसाठी टाइप सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. काही विशिष्ट कार्यासाठी काही विशिष्ट संस्थांना टाइप सर्टिफिकेटची आवश्यकता भासत नाही. ड्रोनच्या विशिष्ट मॉडेलचे टाइप सर्टिफिकेट कसे प्राप्त करायचे, याचीही माहिती वरती दिलेल्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

2. Unit Identification Number- UIN

रस्त्यावरून धावणाऱ्या गाड्यांचे मॉडेल प्रमाणिकरण झाल्यानंतर आपण ते विकत घेतेवेळी RTO कडे नोंदणी केली जाते. त्यानुसार एक नोंदणी क्रमांक (Registration Number) मिळतो. त्यानंतरच ती गाडी विविध कामासाठी वापरता येते. त्याचप्रमाणे DGCA ने ‘Type Certificate’ दिलेल्या मोडेलचे ड्रोन खरेदी करावयाचा असल्यास त्या ड्रोनची DGCA कडे नोंदणी करणे आवश्यक असते.

DGCA कडून मिळालेल्या नोंदणी क्रमांकालाच ‘युनिट आयडेंटिफिकेशन नंबर’ (UIN) असे म्हणतात. सर्वसामान्यांसाठी तो नंबर प्राप्त करून घेणे बंधनकारक आहे. मात्र विशिष्ट संस्थांना विशिष्ट प्रकारच्या कार्यासाठी हा नंबर घेणे आवश्यक नाही.

ड्रोनची नोंदणी :

कोणत्याही व्यक्तीने ड्रोनचा वापर करण्यासाठी प्रथम ‘डीजीसीए’ च्या ‘Digital Sky Platform वर जाऊन नोंदणी करावी. त्याशिवाय ड्रोनचा वापर करता येणार नाही.

ड्रोनच्या नोंदणीसाठी अर्जप्रक्रिया : ड्रोनसाठी युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक (UIN) मिळविण्यासाठी डिजिटल स्काय प्लॅटफॉर्मवर अर्ज ‘Form D-2’ विहित शुल्कासह भरावा. आवश्यक सर्व माहिती भरावी..

ड्रोन निर्मात्याद्वारे डीजीसीए कडून मान्यता मिळवलेल्या प्रारूपाचा अनुक्रमांक आणि त्याच्या फ्लाइट कंट्रोल मॉड्यूल आणि रिमोट पायलट स्टेशनचे अनुक्रमांक यांच्याशी ड्रोनचा युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक (UIN) जोडला जाईल. तो क्रमांक आपल्याला युनिट आयडेंटिफिकेशन क्रमांक म्हणून मिळतो.

हे पण नक्की वाचा : शेळी, मेंढीपालनासाठी शासन देणार 25 लाख अनुदान

3. Remote Pilot Licence

एखादी गाडी चालविण्यासाठी ज्या प्रमाणे योग्य तो परवाना घ्यावा लागतो, त्याच प्रमाणे ड्रोन चालविण्यासाठी चालकाला ड्रोन चालविण्याचा परवाना प्राप्त करणे आवश्यक असते. या परवान्याला ‘ रिमोट पायलट परवाना’ असे संबोधतात.

ड्रोन पायलट परवाना कुणाला मिळू शकतो ?

  • 18 ते 65 वर्षे वय
  • मान्यताप्राप्त मंडळातून कमीत कमी 10 वी पास किंवा समतुल्य
  • डीजीसीएने विहित केलेले प्रशिक्षण कोणत्याही अधिकृत रिमोट पायलट प्रशिक्षण संस्थेतून (RPTO) यशस्वीरीत्या पूर्ण केलेले असावे.

ड्रोन वापरण्यास प्रतिबंधित असलेले क्षेत्र:

  • राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने विमानतळ, सैनिकी संस्था इ. काही हवाई क्षेत्रावर ड्रोन उडविण्यास प्रतिबंध आहेत.
  • सदर प्रतिबंधित क्षेत्रासोबतच सभोवतालच्या पाच कि.मी. पर्यंतच्या प्रक्षेत्रावरून (यास रेड झोन असे संबोधतात.) ड्रोन उडविण्यास परवानगी नाही.
  • अशा प्रतिबंधित क्षेत्रापासून पाच ते आठ कि.मी. अंतरापर्यंत ड्रोन उडवायचा असल्यास तर त्यास हवाई वाहतूक नियामकाची (Air Traffic Controller – ATC) परवानगी आवश्यक आहे. या क्षेत्राला ‘यलोझोन अंतर्गत’ (यलो झोन इनर) असे संबोधतात.
Agriculture Drone : शेतात ड्रोन वापरण्यासाठी शासनाकडून घ्यावी लागते परवानगी | संपूर्ण माहिती वाचा

👉खुशखबर ! आता मिळणार फ्री शिलाई मशीन👈

Rate this post

Leave a Comment