Agri Drone Scheme – कृषी ड्रोन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतातील फवारणी सोपी आणि कमी मेहनती मध्ये व्हावी म्हणून ड्रोन उपलब्ध करून देणे आणि शेतातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे हा उद्देश कृषी ड्रोन योजनेचा आहे.
Agri Drone Scheme
आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी पिकांच्या संरक्षणासाठी पिकांवर फवारणी करतात. ह्या फवारणीसाठी अधिकतर शेतकरी हे पाठीवरच्या पंपाचा वापर करतात. त्यामुळे शेतकऱ्यांजवळ किटक नाशकां पासून संरक्षित राहण्यासाठी काहीच उपाययोजना नाहीत.
त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना त्वचा रोग आणि विषबाधा होते. त्यात काही शेतकऱ्यांना आपले प्राण देखील गमवावे लागतात. या सर्व समस्यांचा विचार करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना शेत फवारणीसाठी ड्रोन उपलब्ध करण्याच्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. या योजनेअंतर्गत ड्रोन खरेदीसाठी अनुदान देण्यात येणार आहे.
Agri Drone Scheme – कृषी ड्रोन अनुदान योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम ही पुढील प्रमाणे देण्यात येईल.
- कृषी विद्यापीठे व सरकारी संस्था – 100% अनुदान. अनुदानाची रक्कम 10 लाख रुपयांपर्यंत
- शेतकरी उत्पादक संस्था – 75% अनुदान. अनुदानाची रक्कम 7 लाख 50 हजार रुपये.
- शेतकरी उत्पादक संस्थेनी ड्रोन भाड्याने घेतल्यास- 6 हजार रुपये प्रतिहेक्टर अनुदान दिले जाईल.
- संस्थांना ड्रोनचे प्रात्यक्षिक राबवण्यासाठी 3 हजार रुपये अनुदान.
- अवजारे सेवा सुविधा केंद्रांना – 50% अनुदान. अनुदानाची रक्कम 5 लाख रुपयांपर्यंत
- कृषी पदवीधारकाने अवजारे सेवा केंद्र सुरू केल्यास – 50% अनुदान. अनुदानाची रक्कम 5 लाख रुपयांपर्यंत.
- 10 वी पास व रिमोट तंत्राचे प्रशिक्षण घेतलेल्या कोणत्याही युवकाला – 40% अनुदान. अनुदानाची रक्कम 4 लाख रुपयांपर्यंत.
👉शेळी मेंढी पालनासाठी 25 लाख अनुदान👈
शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे. शेतकऱ्यांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनविणे. शेतकऱ्यांना पीकांवर फवारणीसाठी ड्रोन खरेदीसाठी अर्थिक अडचणी येऊ नयेत. किंवा कोणावरही अवलंबून राहू नये म्हणून कृषी ड्रोन अनुदान योजना सुरु करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी पुढील वेबसाईटला भेट द्या. https://mahadbt.maharashtra.gov.in/
👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈