Join WhatsApp Group

Adhaar Card Update: आता तुमच्या मोबाईलद्वारे करा आधार कार्ड अपडेट. वाचा संपूर्ण माहिती.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Adhaar Update: नमस्कार मित्रांनो, भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड हे एक महत्त्वाचे असे ओळखपत्र आहे कारण सर्व सरकारी योजनांसाठी आधारकार्ड हे अनिवार्य आहे. ज्यांच्याजवळ आधारकार्ड आहे तेच सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता. अशातच आता शासनाने अशी घोषणा केली आहे कि ज्यांचे आधार कार्ड 10 वर्षांपासून अपडेट केले नसतील त्यांना आधारकार्ड अपडेट करणे अनिवार्य आहे. आजच्या या लेखात आपण मोबाईलद्वारे आधार कार्डामध्ये अपडेट कसे करायचे ते बघणार आहोत.

हे पण बघा: आधार कार्ड अपडेट करा केले नाहीतर.

Adhaar Card Update: 10 वर्षे जुने झालेले आधारकार्ड अपडेट करणे अनिवार्य आहे. असे UIDAI कडून सांगण्यात आले आहे. त्यासाठी आपण आपले आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आधार सेवा केंद्रात जाऊ शकता किंवा आपल्या Smartphone द्वारे आधार कार्ड अपडेट करू शकता.

How to Update Adhar Card From Mobile / मोबाईल द्वारे आधार कार्ड अपडेट कसे करावे?

मोबाईल द्वारे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.मोबाईल द्वारे आधार कार्ड अपडेटसाठी खाली स्टेप्स फॉलो करा.

  1. सर्वात आधी UIDAI च्या Myadhaar http://myaadhar.uidai.gov.in/ या पोर्टलवर जा किंवा प्लेस्टोरवरून mAadhaar हे Application डाऊनलोड करा.
  2. नंतर लॉगिन या पर्यावावर क्लिक करा.
  3. लॉगिन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आधार कार्ड नंबर टाकून त्याखालील कॅप्चा कोड टाकावा. आणि Send OTP वर क्लिक करा.
  4. नंतर आधार कार्डला लिंक असणाऱ्या मोबाईल नंबर OTP येईल, तो OTP टाकून लॉगिन करा.
  5. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला आधार कार्डशी संबंधित सर्व पर्याय दिसतील ,यामध्ये Document Update या पर्यायावर क्लिक करा.
  6. नंतर Next वर क्लिक करा ,त्यानंतर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय दिसेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा आयडी पुरावा अपलोड करावा लागेल , ज्यामध्ये तुम्ही पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स अपलोड करू शकता.
  7. पत्ता अपडेट करण्यासाठी तुम्हाला ॲड्रेस प्रूफ अपलोड करावा लागेल म्हणजेच ॲड्रेस प्रूफमध्ये पॅनकार्ड, पासपोर्ट, रेशनकार्ड, पासबुक, ड्रायविंग लायसेंस, मतदान कार्ड अपलोड करू शकता.
  8. वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सबमिट (Submit) या पर्यायावर क्लिक करा.

अशा प्रकारे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करून आधार कार्ड अपडेट करू शकतात.

नक्की बघा: मोबाईल द्वारे पॅनला आधार लिंक कसे करावे

महत्त्वाचे: आधार कार्ड बायोमेट्रिक जसे Thumb Impression, फोटो अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार सेवा केंद्रात जावे लागेल. तेथे अपडेट करण्यासाठी ₹50 शुल्क आकारले जाते.

WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

आधारकार्ड धारकांसाठी ही माहिती महत्त्वाची आहे त्यामुळे ही माहिती आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या.

5/5 - (2 votes)

Leave a Comment