Join WhatsApp Group

PAN Link with Aadhar : पॅन कार्डला आधार लिंक करण्यासाठी केंद्र शासनाने केली मुदतवाढ. वाचा संपूर्ण माहिती.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

PAN Link with Aadhar Card : देशातील सर्व नागरिकांसाठी आनंदाची बातमी. केंद्र शासनाने आधार क्रमांक आणि पॅन कार्ड लिंक ( Aadhar Link ) करण्यासाठी मुदतवाढ केली आहे. याबाबतचे परिपत्रक केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाने जारी केले आहे. याच परिपत्रकात आधार क्रमांक आणि पॅन ओळखपत्र लिंक करण्याची माहिती दिली आहे. बऱ्याचजणांनी अजून पर्यंत पॅन कार्डला आधार लिंक केलेले नाही त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. पॅन कार्डला आधार लिंक करण्याची शेवटची तारीख काय आहे? पॅन कार्डला आधार लिंक कसे करावे? याची संपूर्ण माहिती आपण पुढे बघणार आहोत.

PAN Link with Aadhar : पॅन कार्डला आधार लिंक करण्यासाठी केंद्र शासनाने केली मुदतवाढ. वाचा संपूर्ण माहिती.
पॅन कार्डला आधार लिंक करण्यासाठी मुदतवाढ (PAN Card-Aadhar Link) :
  1. पॅन कार्डला आधार लिंक करण्यासाठी यापूर्वी शेवटची मुदत ही 31 मार्च 2023 होती.
  2. आता पॅन कार्डला आधार लिंक करण्यासाठी 30 जून 2023 पर्यंत मुदतवाढ केली आहे.

हे पण नक्की बघा : मतदान कार्डला-आधार लिंक करण्याची मुदत वाढली.

How to Link PAN with Aadhar Card / पॅनकार्डला आधार लिंक कसे करावे.

खालील प्रक्रियेद्वारे तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक करू शकता.

  1. आयकर ई-फिलिंग पोर्टल वर जावे.
  2. या पोर्टलवर गेल्या नंतर तुम्हाला लिंक आधार (Link Adhaar) या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  3. लिंक आधार (Link Adhaar) या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर टाकून Validate करावे लागेल.
  4. नंतर दिलेल्या सूचनांनुसार तुम्हाला माहिती भरायची आहे.
  5. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर तुमचा आधार तुमच्या पॅनशी यशस्वीरित्या लिंक झाला आहे. असा मेसेज दिसेल.
PAN Link with Aadhar : पॅन कार्डला आधार लिंक करण्यासाठी केंद्र शासनाने केली मुदतवाढ. वाचा संपूर्ण माहिती.
👉 आधार लिंक करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
SMS Through Link PAN with Aadhar Card :

Send UID PAN → SPACE → 12 digit Aadhaar (आधार कार्ड नंबर) →Space →10 digit PAN (पॅन कार्ड नंबर) to 567678 or 56161

For example : UID PAN 34512349891 CFIED1234J

हे पण बघा : या मोबाईल ॲपद्वारे सरकार देणार पैसे

How to Check Status PAN Link With Aadhar Card / पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे किंवा नाही कसे चेक करावे.
  1. सर्वप्रथम https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या वेबसाईटवर जा.
  2. नंतर लिंक आधार स्टेटस (Link Adhaar Status) या पर्यायावर क्लिक करा.
  3. त्यानंतर पॅन कार्ड क्रमांक (PAN) व आधार कार्ड क्रमांक ( Aadhar Number) टाका.
  4. आणि View Link Adhaar Status वर क्लिक करा.
  5. त्यानंतर स्क्रीनवर एक पॉप अप मेसेज दिसेल कि तुमचे आधार पॅनशी लिंक आहे किंवा नाही

ही माहिती सर्व सामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे ही माहिती आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेयर करा. व अशाच डिजीटल माहितीसाठी www.aapliservice.com या वेबसाईटला भेट द्या.

3/5 - (2 votes)

Leave a Comment