Join WhatsApp Group

Teacher Recruitment : शिक्षक होण्याचे स्वप्न बघणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता डीएड अभ्यासक्रम बंद होणार.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Teacher Recruitment : शिक्षक होण्याचे स्वप्न बघणार्‍यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण आता डीएड (D.ed) अभ्यासक्रम बंद होणार आहे. शिक्षक होण्यासाठी जे विद्यार्थी तयारी करत होते त्यांच्यासाठी ही एक खास बातमी आहे. कारण आता नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी 12 वी नंतर डी एड ऐवजी 12 वी नंतर चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रमात शिक्षणशास्त्र विषय घेऊन शिक्षक होण्यासाठी आता बीएड करावे लागणार आहे.

नक्की वाचा: राज्यात लवकरच 30 हजार शिक्षक भरती होणार.

Teacher Bharti 2023: केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरणास मान्यता दिली आहे. त्यामुळे देशातील सर्व अकृषी विद्यापीठामध्ये 2023-2024 पासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षक होण्यासाठी आता चार वर्षांचा बी.एड. (B.ed) पदवी अभ्यासक्रम असणार आहे. त्यामुळे डी.एड (D.ed) अभ्यासक्रम बंद होण्याची शक्यता आहे, असे शिक्षण मंडळाचे म्हणणे आहे.

नक्की बघा: 10वी, 12वी चा निकाल या दिवशी लागणार.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पुढीलप्रमाणे बदल होणार आहेत.
  1. डीएड अभ्यासक्रम नसणार.
  2. पदव्युत्तर विद्यार्थ्यांना एका वर्षात बी.एड. करता येणार.
  3. पदवीधर विद्यार्थ्यांना बी.एड . अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी 02 वर्ष लागतील.
  4. बारावीनंतर बी.एड. करण्यासाठी 04 वर्षांचा बीएड अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे.
WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

शिक्षक होण्याचे स्वप्न बघणारे किंवा शिक्षक भरतीची तयारी करणऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे ही माहिती आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी www.aapliservice.com या वेबसाईटला भेट द्या

5/5 - (2 votes)

Leave a Comment