Join WhatsApp Group

SSC HSC Result 2023: 10वी 12वी चा निकाल जून महिन्यात या तारखांना लागणार.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

SSC HSC Result 2023: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षा ह्या फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांच्या कालावधीत SSC आणि HSC बोर्डाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. आता या परीक्षेच्या उत्तर पत्रिका तपासणीचे काम चालू आहे म्हणजेच 10 वी आणि 12 वीचा निकाल हा लवकरच लावण्यात येणार आहे. 10 वी आणि 12 वीचा निकाल हा कधी लागणार? हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. (SSC Result 2023)

Maharashtra Board Result 2023: 10 वी आणि 12 वी ची परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थ्यांचे पालकही निकालाची खूप आतुरतेने वाट पाहत असतात. शिक्षक कर्मचारी संपावर गेल्यामुळे हा HSC आणि SSC या परीक्षांचा निकाल उशिरा प्रसिद्ध होण्याची शक्यता होती पण आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ जून महिन्यात 10 वी आणि 12 वीचा निकाल प्रसिद्ध करणार आहे. परीक्षेच्या उत्तर पत्रिका तपासणीचे काम हे जोरात सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्र बोर्डाचा निकाल (SSC HSC Result 2023) हा लवकरच प्रसिद्ध केला जाऊ शकतो. 12वी (HSC) चा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होईल आणि 10वी (SSC) चा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध होईल. असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितले आहे. (HSC Result 2023)

हे पण नक्की वाचा: 10 वी 12 वी निकाल (SSC HSC Result) हरवल्यास परत कसे मिळवावे.

Maharashtra State Board Result 2023: SSC Result 2023 आणि HSC Result 2023 चा निकाल पुढे दिलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल. स्टेट बोर्ड निकालाच्या दिवशी दुपारी 01:00 वाजता अधिकृत संकेतस्थळावर निकाल प्रसिद्ध केला जाईल. (SSC HSC Result 2023)

How to Check SSC Result & HSC Result 2023 / 10 वी (SSC) आणि 12 वी (HSC) निकाल कसा पहावा

10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षा 2023 चा निकाल पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

  1. विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जावे.
  2. महाराष्ट्र बोर्डच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर Results टॅब वर क्लिक करावे.
  3. त्यानंतर तुम्हाला जर SSC परीक्षेचा निकाल पाहायचा असेल तर SSC Examination Result March 2023 या पर्यायावर क्लिक करावे,
  4. HSC परीक्षेचा निकाल पाहायचा असेल तर HSC Examination Result March 2023 या पर्यायावर क्लिक करा.
  5. त्यानंतर तुमचा परीक्षेचा Seat No. टाका खाली फक्त आईचे पहिले नाव टाका नंतर View Result या पर्यायावर क्लिक करा.
  6. View Result पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचा निकाल तुम्हाला दिसेल.
  7. नंतर तुमच्या निकालाची प्रिंट काढून जतन करून ठेवावी.

नक्की वाचा: केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात 10 वी पासवर भरती.

10वी 12वी च्या सर्व विद्यार्थीमित्रांसाठी व विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे ही माहिती आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला भेट द्या.

WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Rate this post

Leave a Comment