Join WhatsApp Group

MSP : केंद्र सरकारकडून खरीप हंगामाचे हमीभाव जाहीर, बघा कोणत्या पिकाला किती हमीभाव मिळणार?

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

MSP : केंद्र शासनाने जारी केलेल्या हमीभावाच्या दराचे प्रसिद्धीपत्रक दिनांक 07 जून 2023 रोजी जारी केले, त्यानुसार 2023-2024 च्या खरीप हंगामातील विविध पिकांसाठीचे हमीभाव (MSP) जाहीर केले आहेत. यावर्षीच्या खरीप हंगामातील सर्व पिकांच्या हमीभावात 6 ते 10 टक्क्यांची वाढ ही करण्यात आली आहे. या खरीप हंगामातील पिकांपैकी मूग पिकाला सर्वाधिक म्हणजेच प्रतिक्विंटल ₹8,558/- हमीभाव मिळाला आहे म्हणजेच गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा या पिकाच्या हमीभावात 10.35 टक्क्यांची वाढ केली आहे. खरीप हंगामातील कोणत्या पिकांना किती हमीभाव (MSP) मिळाला आहे हे जाणून घेण्यासाठी आपण हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

कोणत्या पिकाला किती हमीभाव (MSP) मिळाला?

कसे आहेत नवीन हमीभाव?

अ.क्र पिकाचे नांव हमीभाव
(प्रतिक्विंटल)
1.सोयाबीन₹4,600/-
2.मक्का₹2,090
3.भुईमूग₹6,377
4.तूर₹7,000
5.कापूस₹7,020
6.ज्वारी₹3,180
7.मूग₹8,558

वरील प्रमाणे खरीप हंगामातील पिकांसाठी हमीभावाचे (MSP) नविन दर केंद्र सरकारने जाहीर केले आहेत.

हे पण पहा: शेतकऱ्यांच्या मुलांना मिळणार 15 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज.

हमीभाव (MSP) म्हणजे काय?

बोलीभाषेत बोलला जाणारा शब्द हमीभाव हा ‘किमान आधारभूत किंमत’ ऐवजी वापरला जातो, ज्याला इंग्रजीमध्ये Minimum Support Price म्हणजेच MSP बोलले जाते. सरळ भाषेत सांगायचे झाले तर हमीभाव ही खरेदी करण्याची एक प्रणाली आहे, ज्यामाध्यमातून सरकार शेतकर्‍यांचा माल एका ठरविलेल्या किंमतीमध्ये खरेदी करण्याची हमी देत असते. हमीभावाचे दर जाहीर झाल्यानंतर सरकारी खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा माल हमीभावात खरेदी केला जातो.

हे पण बघा: महाराष्ट्र वनविभागात 2,138 जागांवर मेगाभरती सुरु.

पिकांचे हमीभाव कोण ठरवतं?

Commission for Agriculture Cost and Prizes (CACP) कमिशन फॉर ॲग्रीकल्चर कॉस्ट अँड प्रायझेसच्या आकडेवारीनुसार भारत सरकारचे कृषी मंत्रालय पिकांसाठीचे हमीभाव ठरवते. शेतकऱ्यांच्या पिकांना मिळणारा हा हमीभाव संपूर्ण देशात एक सारखाच असतो.

MSP : केंद्र सरकारकडून खरीप हंगामाचे हमीभाव जाहीर, बघा कोणत्या पिकाला किती हमीभाव मिळणार?
WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

सर्व शेतकर्‍यांसाठी खरीप हंगामातील पिकांचे नविन हमीभावाच्या दराची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे ही माहिती आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा व अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला फॉलो करा.

5/5 - (3 votes)

Leave a Comment