Join WhatsApp Group

Adhar PAN Card Link: आधार कार्ड सोबत पॅनकार्ड जोडा अन्यथा बंद होणार. ही आहे शेवटची तारीख.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Adhar PAN Card Link: देशातील सर्व आधार व पॅनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण केंद्र शासनाने आधार कार्ड सोबत पॅनकार्ड जोडणं बंधनकारक करण्यात आल आहे. पॅनकार्ड सोबत आधार कार्ड जोडण्याची म्हणजेच लिंक करण्याची 30 जून 2023 ही शेवटची तारीख आहे. 30 जून 2023 पर्यंत आधार कार्ड सोबत पॅनकार्ड जोडणी न केल्यास तुमचे पॅनकार्ड बंद करण्यात येईल. असे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे. शासनाने आधार पॅनकार्ड जोडणीसाठी अनेकवेळा देण्यात आल्यामुळे ह्या जोडणी प्रक्रियेसाठी आता शुल्क आकारले जात आहे. आता आधार कार्डशी पॅनकार्ड जोडण्यासाठी ₹1000/- शुल्क आकारले जात आहे. पॅन कार्डला आधार लिंक कसे करावे? याची संपूर्ण माहिती आपण पुढे बघणार आहोत.

हे पण पहा: केंद्राकडून खरीप हंगामातील पिकांचे हमीभाव जाहीर

How to Link Online PAN with Aadhar Card / पॅनकार्डला आधार ऑनलाईन लिंक कसे करावे.
खालील प्रक्रियेद्वारे तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक करू शकता.

  1. आयकर ई-फिलिंग पोर्टल वर जावे.
  2. या पोर्टलवर गेल्या नंतर तुम्हाला लिंक आधार (Link Adhaar) या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  3. लिंक आधार (Link Adhaar) या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर टाकून Validate करावे लागेल.
  4. नंतर दिलेल्या सूचनांनुसार तुम्हाला माहिती भरायची आहे.
  5. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर तुमचा आधार तुमच्या पॅनशी यशस्वीरित्या लिंक झाला आहे. असा मेसेज दिसेल.

SMS Through Link PAN with Aadhar Card :
Send UID PAN → SPACE → 12 digit Aadhaar (आधार कार्ड नंबर) →Space →10 digit PAN (पॅन कार्ड नंबर) to 567678 or 56161

For example : UID PAN 34512349891 CFIED1234J

How to Check Status PAN Link With Aadhar Card / पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे किंवा नाही कसे चेक करावे.

  1. सर्वप्रथम https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या वेबसाईटवर जा.
  2. नंतर लिंक आधार स्टेटस (Link Adhaar Status) या पर्यायावर क्लिक करा.
  3. त्यानंतर पॅन कार्ड क्रमांक (PAN) व आधार कार्ड क्रमांक ( Aadhar Number) टाका.
  4. त्यानंतर View Link Adhaar Status वर क्लिक करा.
  5. नंतर स्क्रीनवर एक पॉप अप मेसेज दिसेल कि तुमचे आधार पॅनशी लिंक आहे किंवा नाही

आधारकार्ड व पॅनकार्ड धारकांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे ही माहिती आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेयर करा. व अशाच डिजीटल माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला फॉलो करा.

5/5 - (1 vote)

Leave a Comment