Join WhatsApp Group

Sarkari Yojana: शेतकऱ्यांच्या मुलांसाठी श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना, वाचा संपूर्ण माहिती.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Sarkari Yojana: नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्य सरकार व केंद्र सरकार शेतकरी व शेतकऱ्यांच्या मुलांच्या भवितव्यासाठी विविध योजना राबवित असतात. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेंने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी ‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना’ सुरु केली आहे. कारण शेतकऱ्याने आत्महत्या केल्या नंतर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे महाराष्ट्र शासनाने ‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

Sarkari Yojana: काय आहे श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना?

श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणास मदत मिळावी म्हणून सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 12 वी नंतर पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना ₹05 लाखांपर्यंत विनतारण कर्ज मिळू शकते. या ₹05 लाखांपर्यंतच्या कर्जावर 0 टक्के व्याजदर आहे. ₹5 लाख ते ₹10 लाखापर्यंतचे कर्जासाठी एका सक्षम जामीनदाराची आवश्यकता असेल.₹10लाखाचे वर ते ₹15 लाखापर्यंतचे कर्जासाठी दोन सक्षम जामीनदारांची आवश्यकता असेल.

हे पण वाचा: आता करा मोफत आधार कार्ड अपडेट

श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजनेसाठी पात्रता.

 • महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणार्‍या 2003 ते 2023 या कालावधीत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुले-मुली.
 • बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पदविका / पदवी / पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी.

श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

 1. सातबारा 7/12 उतारा
 2. बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका
 3. महाविद्यालय / विद्यापीठातील पुढील प्रवेश घेतल्याचा पुरावा
 4. शैक्षणिक शुल्क विवरण पत्रक
 5. शेतकरी पित्याच्या आत्महत्येबाबत तहसिलदारांचा दाखला / पोलीस पंचनामा / जिल्हाधिकारी कमिटीने मंजूर केलेली आत्महत्याग्रस्त शेतकयांची यादी, सरपंच /ग्रामसेवक / पोलीसपाटील यांचा दाखला.
 6. एकल माता (पालक) असल्याची नोंद
 7. वार्षिक उत्पन्नाचा दाखला
 8. आई व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड
 9. आई व विद्यार्थ्याचे पैन कार्ड (असल्यास)
 10. इलेक्ट्रिक बिल
 11. नोकरीवर रुजू झाल्यानंतर बँकेस अवगत करण्याबाबतचे हमीपत्र,
 12. विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा कर्ज थकबाकी दाखला (अर्ज करतेवेळी मूळ कागदपत्रे सोबत न्यावीत.)
WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

शासनाचा GR पाहाण्यासाठी येथे क्लिक करा

श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजनेची (Shram Vidya Shaikshanik Karj Yojana) माहिती आपल्या मित्रां देखील नक्की शेअर करा. आणि अशाच सरकारी योजनांच्या माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला फॉलो करा.

Rate this post

Leave a Comment