Join WhatsApp Group

Free Adhar Card Update: आधार कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी, या तारखेपर्यंत मोफत आधार अपडेट करता येणार.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Free Adhar Card Update: आधार कार्ड 10 वर्षे जुने किंवा आधार कार्ड काढून 10 वर्षे पूर्ण झाल्यांनंतर आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक असते. कारण आधार कार्डचा उपयोग हा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी केला जातो तसेच ओळखपत्र म्हणूनही केला जातो. त्यातच आता आधार कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण आधार अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागणार नाहीत अशी माहिती UIDAI ने दिली आहे. मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा 15 मार्च 2023 पासून सुरु केली आहे. आधार कार्ड धारकांना या सुविधेचा लाभ फक्त तीन महिन्यांपर्यंत म्हणजे 14 जून 2023 पर्यंत घेता येईल.

मोफत आधार कार्ड अपडेट सुविधा कधीपर्यंत असणार आहे? Last Date of Free Adhar Card Update

UIDAI मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा ही 15 मार्च 2023 पासून सुरू केली होती. आणि मोफत आधार अपडेट करण्याची शेवटची तारीख ही 14 जून 2023 आहे. म्हणजेच मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधेचा लाभ हा तीन महिने घेता येईल.

हे पण बघा: राज्यात 4 हजार 625 जागांवर होणार तलाठी पदांची मेगाभरती.

Free Adhar Card Update: आधार कार्ड मध्ये कोणत्या गोष्टी अपडेट करणे गरजेचे आहे?
जर तुमचे आधार कार्ड 10 वर्षे जुने झाले असल्यास पुढील गोष्टी अपडेट करणे आवश्यक आहे.

  • फोटो अपडेट
  • बायोमेट्रिक (Thumb) अपडेट.
  • जर तुम्ही तुमचा राहण्याचा पत्ता बदलला असल्यास अपडेट करणे गरजेचे आहे.

आधार कार्ड ऑनलाईन अपडेट कसे करावे? / How to online Update Adhar Card?

  1. आधार कार्ड धारकांनी त्यांच्या आधार क्रमांकाद्वारे https:// myaadhaar.uidai.gov.in/ वर लॉग इन करावे.
  2. त्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर वन टाइम पासवर्ड (OTP) पाठवला जाईल.
  3. नंतर तुम्हाला ‘Document Update’ वर क्लिक करावं लागेल. तिथे तुम्हाला तुमचा तपशील दिसेल.
  4. त्यानंतर तुम्हाला तुमची अपडेटेड माहिती भरायची आहे.
WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

आधार कार्ड धारकांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे त्यामुळे ही माहिती आपण सर्वांना नक्की शेअर करावी. आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला नक्की फॉलो करा.

5/5 - (1 vote)

Leave a Comment