Lightning Protecting App: सध्या अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. ह्या अवकाळी पावसामुळे देशात व राज्यात हाहाकार उडवला आहे. या अवकाळी पावसासोबत मेघगर्जेनेसह आकाशीय वीज पण मोठ्या प्रमाणात पडत आहे. जमिनीवर पडणाऱ्या या वीजेमुळे मनुष्य व जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण हे वाढत आहे, कारण वीज पडण्याची पूर्वसूचना ही मिळत नाही. म्हणून Indian Institute of Tropical Meteorology, (IITM) Pune या संस्थेने विज पडण्याच्या 15 मिनिट अगोदर पूर्वसचना देणारे अॅप तयार केले आहे. आजच्या या लेखात आपण आपण विज पडण्याची पूर्वसूचना देणाऱ्या दामिनी अॅपची (Damini App) माहिती घेणार आहोत म्हणून हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
आकाशीय वीज पृथ्वीवर का पडते?
जानकार लोक सांगतात की, आकाशात विरुद्ध ऊर्जेचे (Plus-Minus Energy) ढग तयार होत राहतात. हे ढग विरुद्ध दिशेने जाताना ते एकमेकांवर जोरात आदळतात. ढगांच्या या घर्षणामुळे वीज निर्माण होऊन ती कंडक्टरच्या शोधात पृथ्वीवर पडते. (Lightning Protecting App)
हे पण वाचा: राज्यात या 17 जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता.
दरवर्षी वीज पडून 2 हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू.
भारतात मागील काही वर्षांपासून वीज पडून मृत्यू आणि नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आहे. वीज पडणे ही भारतातीलच काय पण जगातील सर्वात मोठी धोकेदायक नैसर्गिक आपत्ती आहे. भारतात वीज पडून दरवर्षी 2 हजाराहून अधिक मृत्यू हे होत असतात. म्हणूनच लोकांना वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्यासाठी इंडियन इंस्टीट्यूट ऑफ ट्रॉपीकल मेटेरोलॉजी (IITM) पुणे यांनी वीज पडण्याच्या 15 मिनिट अगोदर पूर्वसूचना देणारे दामिनी अॅप (Damini: Lightning Alert App) तयार केले आहे. (Lightning Protecting App)
हे पण पहा: या 12 अपघातांसाठी मिळणार 2 लाख रुपये.
काय आहे दामिनी अॅप? What is Damini App?
पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या इंडियन इंस्टीट्यूट ऑफ ट्रॉपीकल मेटेरोलॉजी (IITM) पुणे ही एक स्वायत्त संशोधन संस्था आहे. सन 2020 मध्ये या संस्थेने दामिनी (Damini) हे अॅप विकसित केले आहे. दामिनी अॅप भारतात घडणाऱ्या वीजेच्या घटनांकडे लक्ष ठेवण्याचे काम करत आहे. ज्या व्यक्तीच्या मोबाईल फोनमध्ये दामिनी अॅप इंस्टॉल केले आहे त्या व्यक्तीच्या जीपीएस लोकेशेनद्वारे तो राहत असलेल्या ठिकाणाच्या 20 ते 40 किलोमीटर सर्कलमध्ये वीज पडणार की नाही, याची पूर्वसूचना हे अॅप देते, तसेच विजेपासून बचाव करण्याची खबरदारी कशी घ्यावी याची माहिती सुद्धा देते. (Lightning Protecting App)
हे पण बघा: फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार PM Kisan योजनेचा लाभ.
दामिनी अॅप कस वापरायच? How to Use Damini App?
खालील स्टेप्स फॉलो करून तुम्ही दामिनी अॅप वापरू शकता.
- सर्वप्रथम गुगल प्लेस्टोअरवरून दामिनी अॅप डाऊनलोड करण्यासाठी Damini Lightning Alert असे सर्च करा.
- दामिनी अॅप डाऊनलोड झाल्यानंतर अॅपसाठी जीपीएस लोकेशन ची परवानगी द्या.
- त्यानंतर ह्या अॅपमध्ये तुमच्या लोकेशनपासून 40 किलोमीटरच्या अंतरामध्ये एक वर्तुळ (सर्कल) तयार करेल.
- मग तुमच्या भागात पुढच्या 15 मिनिटांत वीज पडण्याची शक्यता आहे की नाही ते सांगेल. या प्रक्रियेसोठी थोडा वेळ लागेल.
- वीज पडणार नसेल, तर No Lightning Warning किंवा बिजली की चेतावनी नही, अशी सूचना तिथं दिलेली असेल.
- जर तुमच्या भागात पुढील 5 मिनिटांत वीज पडणार असेल तर वर्तुळात लाल रंग दिसेल.
- वर्तुळात पिवळा रंग दिसत असेल, तर 5 ते 10 मिनिटांत वीज पडण्याची शक्यता असते.
- आणि जर 10 ते 15 मिनिटांत वीज पडणार असेल तर वर्तुळात निळा रंग दिसेल.
- दामिनी अॅप च्या Instructions या पर्यायामध्ये विजेपासून बचाव कसा करावा याची माहिती दिली आहे.
- Register म्हणजेच दामिनी अॅपवर नोंदणी करण्यासाठी Register या पर्यायावर क्लिक करा.
हे पण पहा: पेरू लागवड करून मिळवा वर्षभर चांगले उत्पन्न.
WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
शेतकर्यांसाठी व इतर सामान्य नागरिकांसाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे ही माहिती आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला फॉलो करा. तसेच लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
द
दामिनी अॅप डाऊनलोड करण्यासाठी Damini: Lightning Alert | येथे क्लिक करा |
हे नक्की वाचा: खुशखबर! नविन विहिरीसाठी मिळणार 4.00 लाख रुपये अनुदान.