Salokha Yojana: महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य शासन राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध हितकारक सरकारी योजना राबवित असते. ज्यामुळे शेतकर्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यातच आता महाराष्ट्र शासनाने आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘सलोखा योजना’ जाहीर केली आहे. या योजनेमुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सलोखा योजना राज्यात फक्त पुढील 02 वर्षांसाठी लागू असेल. काय आहे सलोखा योजना? याची माहिती आपण पुढे घेणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत आवर्जून वाचा.
Salokha Yojana – काय आहे सलोखा योजना? शेतकऱ्यांना आपल्या जमिनींची आदला बदल करण्यासाठी शेतकऱ्यांना याआधी जास्त पैसे मोजावे लागत होते पण सलोखा योजनेमुळे शेतकऱ्यांना अगदी अल्प शुल्कात आपल्या जमिनींची आदला बदली करता येईल. सलोखा योजना ही खास ज्या शेतकऱ्यांना आपल्या ताब्यातील जमिनींची आदला बदली माफक दरात करता यावी यासाठी राबविण्यात येत आहे.
हे पण वाचा: कडबा कुट्टी मशिन अनुदान योजना.
Salokha Yojana – सलोखा योजनेचे फायदे:
- सलोखा योजनेनुसार राज्यातील शेतकर्यांना , नाममात्र ₹1 हजार नोंदणी शुल्क आणि ₹1 हजार मुद्रांक शुल्काच्या बदल्यात शेतजमिनीची अदलाबदल करता येईल.
- सलोखा योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत 26 दस्तांची नोंदणी झाली आहे – म्हणजे यानुसार प्रत्येकी 26 हजार रुपये मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क नागरिकांना भरावे लागले आहे.
- जर सलोखा योजना लागू नसती तर केवळ 26 दस्तांसाठी ₹38 लाख 96 हजार मुद्रांक शुल्क आणि ₹4 लाख 95 हजार नोंदणी शुल्क शेतकऱ्यांना भरावे लागले असते.
हे नक्की वाचा: PM Kisan योजनेचा हप्ता या दिवशी होणार जमा.
मात्र महाराष्ट्र राज्यात सलोखा योजना ही केवळ पुढील 02 वर्षे लागू असेल. म्हणून या सलोखा योजनेचा जास्तीत जास्त शेतकर्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे यांनी शेतकऱ्यांना केले आहे. (Salokha Yojana)
हे पण बघा: प्रत्येक जिल्ह्यात भरणार शासकिय योजनांची जत्रा.
WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
Salokha Yojana – सलोखा योजनेची माहिती राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे या योजनेची माहिती आपल्या सर्व मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच सरकारी योजना व शेतीविषयक माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या.
हे नक्की वाचा: महाराष्ट्र राज्यात पुढील काही दिवसांत विजांसह पाऊस पडणार.