Join WhatsApp Group

Talathi Bharti 2023 : तलाठी भरती जाहिरात प्रसिद्ध, लगेच करा अर्ज.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Talathi Bharti 2023 : Talathi Recruitment 2023, बहुप्रतिक्षेत असणाऱ्या तलाठी पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही पदभरती 4,644 तलाठी पदांसाठी होणार आहे, त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तलाठी पदासाठी ऑनलाईन अर्ज 26 जून 2023 ते 17 जुलै 2023 या कालावधीत करायचा आहे. राज्यातील महसूल विभागाच्या नाशिक, पुणे, कोकण, संभाजीनगर(औरंगाबाद), अमरावती आणि नागपूर या विभागांतील रिक्त असलेली पदे भरण्यात येणार आहेत.

Talathi Bharti 2023 साठी लागणारी वयाची मर्यादा, शैक्षणिक पात्रता, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे त्यासाठी सविस्तर जाहिरात वाचावी मगच Talathi Recruitment 2023 साठी ऑनलाईन अर्ज करावा.

Talathi Bharti Vacancy Details 2023 : पदांचा तपशील

Talathi Bharti 2023 Notification प्रमाणे ह्या भरती साठी एकूण 4644 जागांवर तलाठी पदांची भरती प्रक्रिया होणार आहे :

अ.क्र. पदाचे नावजागा
01तलाठी (Talathi)4,644

Talathi Bharti Educational Qualification : तलाठी पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

  1. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
  2. माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (MS-CIT, CCC आदि) नसल्यास नियुक्तीच्या दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.
  3. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
  4. माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदिारांना मंडळाची मराठी / हिंदी
    भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

Age Limit for Talathi Bharti 2023 / वयोमर्यादा :

17 जुलै 2023 रोजी

  1. खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे
  2. मागासवर्गीय: 18 ते 43 वर्षे

अर्ज शुल्क-

  1. खुला प्रवर्ग: ₹1000/-
  2. राखीव प्रवर्ग: ₹900/-

वेतनमान: ₹25,500 – ₹81,100/-

नोकरीचे ठिकाण: महाराष्ट्र (Maharashtra)

तलाठी भरती महत्त्वाच्या तारखा-

  1. अर्ज सुरु होण्याची तारीख: 26.06.2023
  2. अर्ज करण्याची अंतिम तारीख: 17.07.2023
  3. परीक्षेची तारीख: लवकरच वेबसाईटवर उपलब्ध करण्यात .

निवड प्रक्रिया: ऑनलाईन परीक्षा (CBT)

How to Apply for Talathi Recruitment 2023 / अर्ज कसा करावा :

Talathi Bharti 2023 साठी अर्ज कसा करायचं आहे त्याची सविस्तर माहिती खाली दिली आहे त्या सगळ्या महत्वाच्या स्टेप्स ला फॉलो करा :

  1. Talathi Recruitment 2023 मधील रिक्त पदांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  2. Talathi Bharti 2023 साठी अर्ज करण्यासाठी महाभूमि अभिलेखच्या (Mahabhumi) अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करा.
  3. अर्ज करण्याआधी प्रसिद्ध झालेली संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतर Talathi भरती 2023 साठी अर्ज करावा.
  4. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2023 आहे.
  5. मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.
Talathi Bharti 2023 : तलाठी भरती जाहिरात प्रसिद्ध, लगेच करा अर्ज.

👉संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी👈

👉 येथे क्लिक करा👈

Important Documents for Talathi Bharti 2023 / तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्र –

  1. अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)
  2. वयाचा पुरावा
  3. शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  4. सामाजिकदृष्टया मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा
  5. आर्थिकदृष्टया दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा
  6. अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  7. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
  8. पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
  9. खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  10. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  11. प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  12. भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  13. अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
  14. एस. एस. सी नावात बदल झाल्याचा पुरावा
  15. अराखीव महिला, मागासवर्गीय, आ.दु.व, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र
  16. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
  17. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र

तलाठी परीक्षेचा अभासक्रम : स्वरूप

परिक्षा कालावधी: 02 तास (120 मिनिटे)

क्र.विषयप्रश्न संख्यागुण
1मराठी2550
2इंग्रजी2550
3अंकगणित व बुद्धिमत्ता2550
4सामान्यज्ञान2550
Total100200
3/5 - (2 votes)

Leave a Comment