सरकारी नोकरीची (Sarkari Naukri) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी राज्य सरकारने एक अतिशय महत्त्व पूर्ण निर्णय घेतला आहे. ज्याच्यामुळे सर्व सरकारी नोकरी ( Sarkari Naukri ) करणाऱ्या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्य शासनाने कोणता निर्णय घेतला? कसे आहेत नवे नियम? यासंदभातील थोडक्यात माहिती आपण पुढे पाहू.
कोणता निर्णय घेतला?
राज्य शासनाने सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या सरकारी नोकरीसाठीच्या वयोमर्यादेत 02 वर्षांनी वाढ करण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे(COVID-19) एक वर्ष वाया गेल्यामुळे राज्य शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासनाने यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. असे राज्य सरकारने सांगितले आहे.
हे पण वाचा : (BSF) सीमा सुरक्षा दलात 10 वी पास वरती 1284 जागांसाठी भरती
नवे नियम कसे आहेत?
Sarkari Naukri : राज्य शासनाच्या नव्या नियमानुसार पुढील सरकारी नोकर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
पुढील कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे कोरोना (COVID 19), सदोष माणगीपत्रे आणि मागणीपत्रं न पाठवण्यासारख्या कारणामुळे, पुरेशा जाहिराती प्रसिद्ध न झाल्याने ज्या उमेदवारांना परीक्षांना बसण्याची संधी प्राप्त झालेली नाही
आणि त्यांची कमाल वयोमर्यादा संपुष्टात आली आहे अशा उमेदवारांनी सरकारी नोकरीच्या परीक्षांना बसण्याची संधी प्राप्त व्हावी म्हणून हा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने राज्य शासनातील विविध विभागात 75 हजार नोकर भरतीची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्या नोकरभरतीत हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
हे पण वाचा : राशन कार्ड धारकांना धान्य ऐवजी आता पैसे मिळणार
प्रवर्गनुसार वयोमर्यादेतील वाढ:
- खुला प्रवर्ग 38 ऐवजी 40 वर्षे
- OBC प्रवर्ग 41 ऐवजी 43 वर्षे
- SC/ST प्रवर्ग 43 ऐवज 45 वर्षे
वयोमर्यादेतील ही वाढ 31 डिसेंबर 2023 पर्यंतच लागू राहणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. व ही माहिती सरकारी नोकरीची (Sarkari Naukri ) तयारी करणाऱ्या उमेदवारांपर्यंत नक्की पोहोचवावी.