PPF Withdrawal Rules :- सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही एक चांगली योजना आहे. यात बचतीपेक्षा जास्त व्याज मिळते. आता सात टक्क्यांहून अधिक व्याज मिळत आहे. यात चांगली गोष्ट ही आहे की कोणतीही व्यक्ती पोस्ट ऑफिस किंवा बँकेत दरमहा ५०० रुपये जमा करून याची सुरुवात करू शकते. पीपीएफ (PPF) खात्यात दरवर्षी किमान ₹ ५०० आणि जास्तीत जास्त 1,50,000 रुपये भरता येतात. या खात्यात मध्ये वर्षात १२ वेळा पैसे भरता येतात. खाते चालू ठेवायचे असल्यास तर वर्षातून एकदा तरी पैसे भरावे लागते.याला आणखी एक चांगला भाग म्हणजे, तिचा मॅच्युरिटी कालावधी १५ वर्षे आहे. तिला मध्येच बंद करणे किंवा आंशिक पैसे काढण्याबाबत काही नियम (PPF Withdrawal Rules) आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया….
PPF Withdrawal Rules
तात्पुरते पैसे काढण्याची पद्धत काय?
जर एखाद्या व्यक्तीचे पीपीएफ (PPF ACCOUNT) खाते पाच वर्षे जुने असेल तर त्यातील ५० टक्के रक्कम काढता येते. यासाठी तुम्हाला तुमच्या खात्याच्या कागदपत्रांसह एक अर्जही संबंधित बँक किंवा पोस्ट ऑफिसला द्यावा लागेल. यानंतर पैसे तुमच्या खात्यात ट्रान्सफर होतात.
हे पण नक्की वाचा :- शेतकरी अपघात विमा योजना
अभ्यास आणि उपचारां साठी पैसे काढू शकतात
जर पीपीएफ (PPF) पाच वर्षांचा झाला असेल आणि रक्ताच्या नात्यातील कोणी गंभीर आजरी असेल किंवा मुलाला दहावीनंतरच्या अभ्यासासाठी फीची गरज असेल तर ते बंद करूनही पैसे काढता येतील. मात्र त्यासाठी त्या संबंधीची कागदपत्रे द्यावी लागतील. उपचाराचे बिल किंवा कॉलेजच्या फीची पावती द्यावी लागेल. तुम्ही जरी परदेशात शिफ्ट होत असाल तरी तुम्ही ते बंद करू शकता.
हे पण नक्की बघा :- मिळवा ४ लाखाचे अनुदान बघा सविस्तर माहिती
मृत्यू झाल्यास दंड आकारला जात नाही
जेव्हाही पीपीएफ खाते बंद केले जाते, तेव्हा दंड भरुन खाते बंद केले जाते, परंतु खातेधारकाचा मृत्यू झाल्यास, दंड आकारला जात नाही.
मित्रानो तुम्हाला ही PPF Withdrawal Rules ची माहिती कशी वाटली कॉमेंट्स करून नक्की कळवा आणि ही माहिती पुढे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणे करून त्यांना पण ह्या माहिती चा फायदा होईल धन्यवाद.
हे पण नक्की वाचा :-
- PM Awas Yojana 2024 : पीएम आवास योजनेचे नवीन नियम आणि पात्रता आत्ताच अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या !!
- Free Scooty Yojana : मुलींसाठी खुशखबर !! आता मिळवा 1 ते 2 दिवसातच मोफत स्कुटी, आत्ताच संपूर्ण माहिती बघा आणि अर्ज करा
- Pm Kisan Update : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, या महिन्यात येणार 17वा हप्ता, आत्ताच जाणून घ्या
- येथून पुढे या शेतकऱ्यांना PM Kisan योजनेचा लाभ मिळणार नाही आत्ताच तुमचं नाव आणि डिटेल बघा !
- PM Kisan Yojana: शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी, आता वर्षाला मिळणार 8,000 रुपये.