Join WhatsApp Group

PM Kisan Yojana: शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी, आता वर्षाला मिळणार 8,000 रुपये.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंददायी अशी बातमी आहे कारण केंद्र सरकार PM Kisan योजनेच्य रकमेमध्ये वाढ करू शकते. म्हणजेच आता पीएम किसान सन्मान योजनेची शेतकर्‍यांना मिळणारी वार्षिक रक्कम ही 6000 रुपयांवरून 8000 रुपये होण्याची शक्यत आहे. कारण ह्या वर्षी भारतातील पाच मोठ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका ह्या पार पडणार आहेत. ह्याच कारणामुळे केंद्र सरकार PM Kisan योजनेच्या लाभ वाढीचा निर्णय हा घेऊ शकते. केंद्र शासनाने PM Kisan योजनेअंतर्गत मागील वर्षांत 10,000 करोड रुपयांची बचत ही केली आहे. ह्याच सर्व कारणांमुळे केंद्र सरकार PM Kisan योजनेच्या लाभामध्ये वाढ ही करू शकते. म्हणजेच PM Kisan Samman Yojana अनुसार मिळणार्‍या 6000 रुपयांमध्ये वाढ करणार असून आता शेतकऱ्यांना वर्षाला 6000 ऐवजी 8000 रुपये प्रति वर्ष मिळतील. प्रति शेतकरी 2000 रुपयांच्या वाढीमुळे भारत सरकारला वार्षिक 22,000 करोड रुपयांची अतिरिक्त आवश्यकता लागणार आहे.

PM Kisan Yojana: जर तुम्ही एक शेतकरी आहात आणि तुमच्या नावावर 7/12 सातबारा असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. पीएम किसान योजनेत नाव नोंदवण्यासाठी https://pmkisan.gov.in/ ह्या वेबसाईट वर जा आणि नविन शेतकरी नोंदणी(New Farmer Registration) ह्या वर क्लिक करून आपले नाव पीएम किसान योजनेत नोंदवू शकता.

हे पण वाचा: या दिवशी मिळणार नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता.

काय आहे पीएम किसान योजना?

  1. पीएम किसान (PM Kisan) ही केंद्र सरकारची शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य मिळावे म्हणून सुरू केलेली योजना आहे.
  2. PM Kisan योजना 1.12.2018 रोजी सुरू केली आणि 24 फेब्रुवारी 2019 पासून कार्यान्वित झाली आहे.
  3. PM Kisan योजनेंतर्गत सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना तीन समान हप्त्यांमध्ये प्रतिवर्ष 6,000/- उत्पन्नाचा आधार दिला जाईल. जो कि आता प्रतिवर्ष 8,000/- होण्याची शक्यता आहे.
  4. योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या म्हणजे पती, पत्नी आणि अल्पवयीन मुले.
  5. राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासन योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मदतीसाठी पात्र असलेल्या शेतकरी कुटुंबांची ओळख करेल.
  6. पीएम किसान योजनेचा निधी थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाईल.
  7. PM Kisan योजनेसाठी विविध श्रेणी आहेत.

PM Kisan योजनेसाठी पात्रता.

खालील पात्रता पूर्ण करणारे शेतकरी PM Kisan योजनेचा लाभ घेऊ शकतात.

  1. सर्वप्रथम तुम्ही एक भारतीय शेतकरी असायला हवेत.
  2. सुरुवातीला PM Kisan योजनेसाठी फक्त 2 एकरपेक्षा कमी शेतजमीन असलेले शेतकरीच पात्र होते परंतु नंतर घेतलेल्या निर्णयामुळे सर्व शेतकरी यासाठी पात्र ठरले.
  3. PM Kisan योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  4. PM Kisan योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधारला जोडलेले बँक खाते असणे आवश्यक आहे.

PM Kisan योजनेचा लाभ कोण घेऊ शकत नाही?

उच्च आर्थिक स्थितीचे लाभार्थी पीएम किसान योजने अंतर्गत लाभासाठी पात्र नसतील. ते खाली दिलेल्या प्रमाणे.

A. सर्व संस्थागत जमीनधारक कि जमीन मालक

B. खालीलपैकी एक किंवा अधिक श्रेणीतील शेतकरी कुटुंबे:

  1. संवैधानिक(राजनितीक) पदे असलेले माजी आणि विद्यमान व्यक्ती.
  2. संवैधानिक पदे असलेले माजी आणि विद्यमानमंत्री/राज्यमंत्री आणि लोकसभा/राज्यसभा/राज्य विधानसभा/राज्य विधान परिषदांचे माजी/वर्तमान सदस्य, महानगरपालिकांचे माजी आणि विद्यमान महापौर, जिल्हा पंचायतींचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष.
  3. केंद्र/राज्य सरकारची मंत्रालये/कार्यालये/विभाग आणि त्याच्या क्षेत्रीय युनिट्सचे सर्व सेवानिवृत्त किंवा सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी केंद्रीय किंवा राज्य PSE आणि संलग्न कार्यालये/स्वायत्त संस्था सरकार अंतर्गत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे नियमित कर्मचारी(मल्टी टास्किंग स्टाफ/वर्ग चौथा/गट डी कर्मचारी वगळून).
  4. सर्व सेवानिवृत्त/निवृत्त निवृत्तीवेतनधारक ज्यांचे मासिक पेन्शन रु. 10,000/-किंवा अधिक आहे(मल्टी टास्किंग स्टाफ/वर्ग IV/गट डी कर्मचारी वगळून).
  5. या सर्व व्यक्ती ज्यांनी मागील मूल्यांकन वर्षात आयकर भरला आहे.
  6. डॉक्टर, अभियंता, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि वास्तुविशारद यांसारखे व्यावसायिक व्यावसायिक संस्थांमध्ये नोंदणीकृत आहेत आणि सराव करून व्यवसाय पार पाडतात.
Join कृषी योजना and GroupClick Here

PM KISAN योजनेविषयी ही माहिती सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे ही माहिती आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा आणि अशाच सरकारी व कृषी योजनां विषयक माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या. सर्वात आधी WhatsApp वर अपडेट मिळवण्यासाठी कृषी योजना हा WhatsApp ग्रुप जॉईन करा.

5/5 - (1 vote)

Leave a Comment