PM Kisan Yojana Update: जर तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना ही फेब्रुवारी 2019 मध्ये भारतातील लहान जमिनधारक शेतकर्यांसाठी आर्थिक सहाय्य देणारी एक योजना आहे. जी केंद्र शासनातर्फे राबविली जाणारी योजना आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ हा तीन समान हप्त्यांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. म्हणजेच लाभार्थी शेतकऱ्यांना एकवेळचा हप्ता दोन हजार रुपयांचा हा थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. पीएम-किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता जुलै महिन्यामध्ये वितरित केला जाण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा: रेशनकार्ड धारकांसाठी खुशखबर! मोदी सरकारकडून 2024 पर्यंत मिळणार खास गिफ्ट.
या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. These Farmers Not Get PM Kisan Yojana Benefit
- पीएम किसान योजनेचा लाभ हा त्याच शेतकर्यांना मिळेल ज्या शेतकर्यांनी पीएम किसान पोर्टलवर ई-केवायसी केली असेल (PM Kisan Yojana KYC)
- पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी PM Kisan वेब पोर्टलवर केवायसी करणे गरजेचे आहे.
हे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र नाहीत / These Farmers Not Eligible for PM Kisan Yojana
खालील जमिन धारक शेतकरी कुटुंब हे पीएम किसान योजनेसाठी पात्र नाहीत.
- भारतातील सर्व संस्थात्मक जमिनधारक.
- संवैधानिक पदे असलेले आजी (विद्यमान) – माजी.
- विद्यमान आणि माजी मंत्री/राज्यमंत्री आणि लोकसभा/राज्यसभा/राज्य विधानसभा/राज्य विधान परिषदांचे माजी/वर्तमान सदस्य, महानगरपालिकांचे माजी आणि विद्यमान महापौर, जिल्हा पंचायतींचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष.
- केंद्र व राज्य सरकारची मंत्रालये/कार्यालये/विभाग आणि त्यांच्या क्षेत्रीय युनिट्सचे सर्व सेवेत असणारे किंवा सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी आणि केंद्रीय किंवा राज्य PSE आणि संलग्न कार्यालये व स्वायत्त संस्था सरकार अंतर्गत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे नियमित असणारे कर्मचारी. (मल्टी टास्किंग स्टाफ/वर्ग चौथा/गट डी कर्मचारी वगळून)
- सर्व सेवानिवृत्त/निवृत्त निवृत्तीवेतनधारक ज्यांचे मासिक पेन्शन रु. 10,000/-किंवा त्यापेक्षा अधिक आहे (मल्टी टास्किंग स्टाफ/वर्ग 4/गट डी कर्मचारी वगळून) वरील श्रेणीतील कर्मचारी.
- त्या सर्व व्यक्ती ज्यांनी मागील वर्षात आयकर (Income Tax) भरला आहे.
- व्यावसायिक संस्थांमध्ये नोंदणी असणारे डॉक्टर(Doctor), इंजीनिअर (Engineer), वास्तुविशारद (Architect) आणि चार्टर्ड अकाउंटंट (Charterd Accountant -CA) यांसारखे व्यावसायिक.
वरील जमिनधारक व्यक्ती व त्यांचे कुटुंब हे PM Kisan योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाहीत.
हे पण पहा: फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेचा लाभ.
WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
शेतकऱ्यांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे ही माहिती आपल्या सर्व मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच सरकारी योजनां विषयक व शेती विषयक माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला फॉलो करा. लवकर अपडेट मिळवण्यासाठी कृषी योजना हा WhatsApp ग्रुप जॉईन करा.
हे नक्की वाचा: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत करता येणारे व्यवसाय, मिळणार 50 लाख रुपये.