Educational News: भारतातील बहुसंख्य लोक शेती करतात त्यामुळे भारत देशाला कृषीप्रधान देश म्हणून ओळखले जाते. शालेय विद्यार्थ्यांना शेती विषयक ज्ञान व शेतीचे महत्त्व माहिती व्हावे यासाठी महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश व्हावा अशी मागणी शालेय शिक्षण विभागाकडे केली होती. कारण शेतीचे महत्त्व हे शालेय विद्यार्थ्यांना माहिती होणे हे खूप महत्त्वाचे आहे कारण शालेय विद्यार्थी हेच देशाचे भविष्य आहेत. त्यांना शेतीचा विसर पडू नये म्हणून शालेय विद्यार्थांना शेती विषयी माहिती होणे हे खूप गरजेच आहे.
Educational News: महाराष्ट्र राज्यातील शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश होणार आहे. कृषी विषयाचा समावेश शालेय शिक्षण अभ्यासक्रमात व्हावा यासंबंधीचा प्राथमिक अहवाल कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे देण्यात आला असून शिक्षण विभागाने तो अहवाल स्वीकारला आहे.
हे पण बघा: महाराष्ट्रात पुढचे काही दिवस विजांसह पाऊस पडणार.
कसा असणार शालेय कृषी विषय अभ्यासक्रम?
- कृषी शिक्षण विषयक एकात्मिक आराखडा तयार करताना इयत्ता १ली ते ५वी, ६वी ते ८वी आणि ९वी ते १० अशा पद्धतीने अभ्यासक्रम ठेवावा असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
- तसेच कृषिविषयक अभ्यासाच्या परीक्षणासाठी जे जे साहित्य आणि मदत लागेल ते उपलब्ध करून देण्याची तयारी कृषी विभागाची असेल असे अब्दुल यांनी सांगितले आहे.
- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद आणि कृषी परिषद कडून तज्ञांची समिती नेमून कृषी अभ्यासक्रमाचा आराखडा तयार केला जाणार आहे.
हे पण वाचा: नवीन विहिरीसाठी मिळणार 4 लाख रुपये अनुदान.
WhatsApp वर बातम्या मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी व विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी शालेय शिक्षणामध्ये कृषी विषयाचा समावेश होणार आहे ही बातमी खूप महत्त्वाची आहे त्यामुळे ही बातमी आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या.
नक्की वाचा: रोपवाटिका उभारण्यासाठी शासन देणार अनुदान.