Join WhatsApp Group

पडीक जमीन भाड्याने देऊन कमवा बक्कळ पैसा पहा राज्यशासनाची खास योजना

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

पडीक जमीन भाड्याने देऊन कमवा बक्कळ पैसा : ज्या शेतकऱ्यांकडे पडीक अशी जमीन आहे अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची व मोठी बातमी आहे. राज्य सरकारला पडीक जमीन भाड्याने देऊन बक्कळ पैसा कमावण्याची संधी आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. सौरऊर्जा प्रकल्पासाठी ह्या पडीक जमिनीचा वापर राज्यशासन करणार आहे. तसेच शेतकऱ्यांना त्या जमिनीचा मोबदला दिला जाईल असे उपमुख्यमंत्री (अर्थमंत्री) देवेंद्र फडणवीस पाणी फाऊंडेशनतर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर कप 2022’ च्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलले होते. या योजनेच्या आधारे शेतकर्‍यांना प्रति एकरमागे ₹75,000 हजार देणार असल्याचे सांगितले.

शेतीसाठी दिवसा 12 तास वीज पुरवठा व्हावा अशी मागणी योग्यच आहे, यासाठी शेतीसाठीचे फिडर सौर ऊर्जेवर आणण्यात येतील असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 30 टक्के फीडर यावर्षी सौरऊर्जेवर आणण्यात येतील व उर्वरित फिडर पुढील दोन वर्षात सौरऊर्जेवर आणण्यात येतील. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा 12 तास वीज उपलब्ध होईल.

हे नक्की बघा : मागेल त्याला मिळणार शेततळे शेतकऱ्यांना मिळणार 90 टक्के अनुदान

राज्यशासन कोणती जमीन भाड्याने घेईल?
  1. याकामासाठी सर्वप्रथम सरकारी पडीक जमीनीचा वापर करण्यात येईल. याशिवाय फिडर जवळ्च्या पडीक शेतजमीन 30 वर्षे भाड्याने घेण्यात येईल
  2. या जमिनीची मालकी ही त्याच शेतकऱ्यांची असणार आहे. 30 वर्षे पूर्ण झाल्या नंतर ती जमीन शेतकर्‍याला परत देण्यात येईल.
  3. यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्नही मिळेल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे पण बघा : खुशखबर! मुलगी जन्माला आल्यानंतर मिळणार 5000 हजार रुपये

सौरऊर्जा प्रकल्पासाठी भाड्याने घेतलेल्या जमीनीचा किती मोबदला मिळेल?
  1. राज्य शासनाने सौरऊर्जा प्रकल्पासाठी भाड्याने घेतलेल्या जमीनीचा मोबादला हा प्रति एकरमागे ₹75,000 हजार इतका मिळेल
  2. तसे दरवर्षी दिला जाणारा मोबदला हा वाढवून मिळेल.

तर शेतकरी मित्रानों पडीक जमीन भाड्याने देऊन कमवा बक्कळ पैसा ही माहिती आपल्या शेतकरी मित्रानों पर्यन्त नक्की पोहचवा, आणि काही प्रश्न विचाऱ्याची असतील तर कमेन्ट करा धन्यवाद .


✅ सरकारी योजना ✅

Rate this post

Leave a Comment