E-Peek Pahani | इ-पीक मध्ये नोंदणी करण्यासाठी भेटली मुदतवाढ पिकाची नोंदणी करा फक्त 2 मिनट मध्ये

E-Peek Pahani : नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी एकदम महत्वाची बातमी आहे, जर तुम्ही अजून ही तुमच्या पिकाची ची नोंदणी नसेल केली तर राज्य व केंद्र सरकारने नोदणी करण्याकरिता मुदतवाढ दिली आहे, दिलेल्या तारखे च्या आधी तुमच्या पिकाची नोंदणी करून घ्या जेणे करून तुम्हाला पीक विमा चा फायदा होईल.

पुढील काही काळात जर काही अतिदृष्टी किंवा काही परिस्थितीमध्ये काही कारणास्तव तुमच्या पिका ची नुकसानी झाली तर तुम्हाला ह्या पीक विमा चा राज्य व केंद्र सरकार कढून फायदा होईल म्हणजेच राज्य सरकार काढून तुम्हा पिकाचा पीक विमा च्या अंतर्गत तुम्हाला राज्य सरकार कढून पिकाची नुकसानीस मदत मिळेल, त्या मुळे पिकाचा पीक विमा नोंदणी नक्की करून घ्या.

इ-पीक पाहणी मध्ये नोंदणी कशी करायची?

पिकाची नोंदणी करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी इ -पिक पाहणी चे ॲप डाऊनलोड करावे लागेल त्या नंतर तुम्ही तुमच्या पिकाची नोंदणी इ-पीक पाहणी ॲप वरती शकतात, इ-पीक पाहणी ॲप वरती नोंदणी करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा :

1) सगळ्यात आधी गूगल play स्टोअर मध्ये जाऊन इ -पीक पाहणी असेल सर्च करायचे आहे. आणि E-PEEK पाहणी ॲप ला डाऊनलोड करून घेयाच आहे. 👉येथे क्लिक करा👈
2) त्या नंतर ॲप ला ओपन करायचं आहे, तुम्हाला तिथे इ पीक पाहणी नावाचे पेज दिसेल त्याला डावी बाजू ला सरकवल्यास नोंदणी करण्यासाठी ची माहिती तुम्हाला दिसेल, जसे की ८ – अ, सातबारा उतारा इत्यादी.
3) त्या नंतर तिथे तुम्हाला महसूल विभागाला सिलेक्ट करायचं आहे आणि नवीन खातेदार नोंदणी ह्या पर्याया वरती क्लिक करायचं आहे.
4) त्या नंतर सुवतीला तुमचा विधाग, नाव, गाव, तालुका, जिल्हा हे निवडून पुढे जायचं आहे.
5) मग तुमचे संपूर्ण नाव, खाते नंबर, गट क्रमांक टाकून खातेदार निवडू शकतात. इथे खाली गट क्रमांक टाकून शोधा वरती क्लिक करून तुम्ही त्या गटातील खातेदाराला निवडू शकतात, आणि त्याच नाव खाते क्रमांक त्यापासून पुढे जायचं आहे, त्या नंतर तुमच्या समोर संकेतांक पाढवा नावाचे पेज दिसेल, “आपली नोंदणी खालील मोबाईल क्रमांकावर करण्यात येत आहे” अशी सूचना तुम्हाला दिसेल, जर तुम्हाला तुमचे नंबर बदलायच असेल तर number बदला वरती क्लिक करून बदलू शकतात, त्या नंतर पुढे जा वरती क्लिक करा.
6) जर तुम्ही मागच्या वर्षी नोंदणी केली असेल तर “तुमची नोंदणी आधीच झाली आहे, तुम्हाला पुढे जायचे का” अस दिसेल, पहिल्यांदा करत असला तर मेसेज येणार नाही.
7) हो पर्याय वरती क्लिक करून खातेदाराच्या नाव निवड, आणि सांकेतांक विसरलात यावर क्लिक करून मग सांकेतांक क्रमांक टाका.
8) आत्ता तुम्ही तुमच्या पिकाची नोंदणी करू शकतात , इथे पीक माहिती नोंदवा या वरती क्लिक करायचं आहे. मग तिथे खाते क्रमांक, गट क्रमांक की लागवडी खालील जमिनीचं एकूण क्षेत्र किती आणि पोटखराब क्षेत्र किती तिथं येईल.
9) मग हंगामी पीक निवधून पाकचा वर्ग निवडायचं आहे, त्याचा पिकाचा प्रकार, पिकाची नाव व क्षेत्र हेक्टर टाकायचं आहे.जल सिंचनाचे साधन, पद्धत आणि लागवडीची तारीख टाकायची आहे.
10) त्या नंतर फोटो काढा वरती क्लिक करून तुमच्या पिकाचा फोटो काढून अपलोड करायचा आहे, हा फोटो तुम्ही शेता मध्ये जाऊन तिथून फोटो काढून अपलोड करायचा आहे.
11) मग खाली बरोबर च्या खूने वर क्लिक करायचं आहे, मग तुम्हाला तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती दिसेल, मग पुढे जा वरती क्लिक करायचं आहे.
12) पिकाची माहिती पाठवली आहे अशी सूचना येईल त्याला ठीक आहे असेल क्लिक करायचे आहे.
13) त्या नंतर पिकाची माहिती पाहा वरती क्लिक करून भरलेली तुम्ही माहिती बघू शकतात.

अश्या प्रकारे तुम्ही E- Pik Pahani (इ पीक पाहणी) मध्ये नोंदणी करू शकतात व राज्य सरकारच्या मदतीचा फायदा घेऊ शकतात.

शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणे करून ज्यांनी आत्ता पर्यंत इ पीक पाहणी मध्ये नोंदणी नसेल केली तर करण्यास मदत होईल.

E-Peek Pahani | इ-पीक मध्ये नोंदणी करण्यासाठी भेटली मुदतवाढ पिकाची नोंदणी करा फक्त 2 मिनट मध्ये

👉कृषी ड्रोन घेण्यासाठी मिळणार 50% ते 75% अनुदान👈

Rate this post

Leave a Comment