Thibak Sinchan Yojana – भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. भारतात निम्म्याहून अधिक लोकसंख्या शेती व्यवसायावर अवलंबून आहे. शेती करण्यासाठी पाणी हे खूप महत्त्वाचे आहे. आजकाल शेतीला पाण्याची खूपच कमतरता आहे. त्यामुळे भारतातील शेतकरी आता ठिबक सिंचनाचा (Thibak Sinchan) वापर करताना दिसत आहे. ठिबक सिंचनामुळे पाण्याचीही बचत होते आणि पिक पण जोमदार येते व शेतकर्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ पण होते.
ठिबक सिंचनामुळे (Thibak Sinchan) शेतकऱ्यांचा फायदाच होतो. त्यामुळेच महाराष्ट्र सरकारद्वारे ठिबक सिंचन योजना (Thibak Sinchan Yojana) राबविण्यात आली असून यात शेतकऱ्यांना 75 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. ह्या योजनेचा शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे.
Thibak Sinchan Yojana
📁Table of Contents
ठिबक सिंचन योजनेचे फायदे (Thibak Sinchan Yojana)
सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या ठिबक सिंचन योजना ही शेतकर्यांच्या हिताची अशी योजना आहे, ज्यामुळे शेतकर्यांचे अधिकाधिक पाण्याची बचत ही होणार आहे आणि पिकांना प्रमाणात पाणी मिळाल्यामुळे पिकांची वाढ ही जोमदार होउन भरघोस उत्पन्न हे शेतकऱ्यांना मिळणार आहे. जर विनाअनुदान ठिबक संच घेतल्यास ते आपल्याला खूपच महाग पडते त्यामुळे शासनाने ठिबक सिंचन ही योजना (Thibak Sinchan Yojana) सुरु केली आहे. ज्यात शेतकऱ्यांना 75 टक्क्यांपर्यंत अनुदान हे मिळते म्हणजे शेतकऱ्यांना फक्त 25 टक्के खर्च करायचा आहे. उदाहरण जर ₹100000 लाखांचा ठिबक सिंचन संच घ्यायचा ठरल्यास शेतकऱ्यांना फक्त ₹25,000 खर्च करायचे आहे.
हे पण वाचा : राशन कार्ड धारकांना धान्य ऐवजी आता पैसे मिळणार
ठिबक सिंचन अनुदान योजना किती टक्के अनुदान मिळेल?
सरकारच्या नियमांनुसार ठिबक सिंचन योजनेचा फायदा गरीब शेतकरी घेऊ शकतात.
- अल्पभूधारक शेतकरी 55% व पूरक 25% अमुदान एकूण 80% अनुदान
- इतर शेतकरी 40% व पूरक 35% अनुदान एकूण 75% अनुदान
🔰 नवनवीन सरकारी जॉब, सरकारी योजना, आणि शेती अपडेट साठी आत्ताच जॉइन करा✔
(Thibak Sinchan Yojana) ठिबक सिंचन अनुदान योजनेसाठी कोण पात्र आहेत?
शासनाच्या नियमानुसर ठिबक सिंचनासाठी अनुदान हे पाच हेक्टर क्षेत्रावर दिले जाते, त्यापेक्षा अधिक क्षेत्रावर दिले जात नाही ज्या शेतकऱ्यांकडे लागवडीसाठी 0.2 हेक्टर जमीन आहे त्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेता येणार असून, त्यांना ठिबक सिंचन योजना शेतामध्ये बसवतात येणार आहे.
हे पण वाचा : शेतकरी अपघात विमा लाभ थेट शासनमार्फत मिळणार
ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
- ठिबक सिंचन अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढे दिलेल्या वेबसाइट वर जावे.
- वेबसाइटवर गेल्यानंतर आवश्यक ती माहिती योग्य प्रकारे यात भरावी, व नंतर तुमचा फॉर्म सबमिट करावा
- नंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही, हे तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर द्वारे कळविले जाईल.
✔ठिबक सिंचन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची वेबसाईट👇