Shettale Yojana – भारतातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या ही शेती व्यवसाय करते. शेतकऱ्यांच्या शेती करण्यासाठी पाणी ह्या मुख्य संसाधनाची गरज भासते कारण पाण्याशिवाय शेती करणे हे अशक्य त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे सोपे व्हावे यासाठी शासन विविध योजना ह्या शेतकऱ्यांसाठी राबवत असते. त्यातीलच एक योजना म्हणजे ‘मागेल त्याला शेततळे’ (shettale yojana 2023 maharashtra ) योजना ह्या योजनेत लाभार्थी शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान हे दिले जाते. समजा जर शेतकऱ्याला शेततळे बनविण्यासाठी 100 रुपये खर्च आला तर शासन त्या शेतकऱ्याला 90 रुपये अनुदान स्वरूपात देते.
हे पण नक्की बघा : घर की मुखिया महिला को ₹2000 दिए जाएंगे, जानिए क्या है योजना.
ShetTale Yojana 2023 Eligibility Criteria | शेततळे योजना 2023 पात्रता –
मागेल त्याला शेततळे योजनेसाठी (Shetatle Anudan Yojana) पुढील शेतकरी पात्र राहतील :
- अर्जदार शेतकऱ्याच्या नावावर कमीत-कमी 0.6 हेक्टर ( 0.6 hector Land Record Required ) जमीन असणे आवश्यक.
- अर्जदार शेतकऱ्याने यापूर्वी शेततळे, सामूहिक शेततळे अनुदान योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
- लाभार्थी शेतकऱ्याचे शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर, सातबारा उताऱ्यावर शेततळ्याची नोंद करणे बंधनकारक राहिल.
- मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत जितक्या आकाराचे शेततळे मंजूर झाले आहे तेवढ्याच आकाराचे शेततळे खोदणे बंधनकारक आहे.
- शेततळ्याची काळजी घेणे व निगा राखणे ही शेतकऱ्यांची प्राथमिक जबाबदारी राहील.
- शेततळे योजनेसाठी ज्या ठिकाणची जागा निश्चित करण्यात आली आहे, त्याच ठिकाणी शेततळे खोदणे बंधनकारक राहील.
- मागेल त्याला शेततळे अनुदान योजनेसाठी लॉटरी लागल्यानंतर कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी यांच्या आदेशानुसार पुढील तीन महिन्यातच काम पूर्ण करणे बंधनकारक असेल.
हे पण नक्की बघा : शेतकऱ्यांना आता वर्षाला 12,000 रुपये राज्य सरकारकडून मिळणार
Required Documents for ShetTale Yojana 2023 | शेततळे योजनेसाठी आवश्यक कागदपत्र
- आधारकार्ड (Adhar Card)
- शेतजमिनीचा 7/12 (सातबारा)
- 8 अ उतारा
- शेततळ्यासाठी साधन खरेदी करण्याचे किंवा उपकरणाचा Quotation
- कंपनीचे Testing Report (पंपासाठी)
- जातप्रमाणपत्र (लागू असल्यास)
- हमीपत्र / संमतीपत्र (यादीत नाव अल्यानंतर)
- बँक पासबुक
हे पण बघा : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पाईप लाईनसाठी मिळणार 50 टक्के अनुदान
How To Apply for ShetTale Yojana 2023 शेततळे योजनेसाठी अर्ज कसा करावा :
- इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी (mahadbt) पोर्टलवर जाऊन लॉग इन करावे.
- लॉग इन केल्यानंतर Dashboard दिसेल. त्यामध्ये तुम्हाला अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- अर्ज करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन 4 घटक दिसतील. ज्यामध्ये कृषीयांत्रिकीकरण, सिंचन, साधने व सुविधा, बि- औषधे व खते, फलोत्पादन हे पर्याय दिसतील.
- तुम्हाला सिंचन साधने व सुविधा या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढीलप्रमाणे घटक निवडायचे आहेत. : मुख्य घटक :- सिंचन साधने आणि सुविधा < बाब :- वैयक्तिक शेततळे < उपघटक :- अर्धा डगआऊट
- संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज पूर्ण करायचे आहे.
- अर्ज सेव केल्यानंतर पुढील टप्प्यामध्ये तुम्हाला 23 ते 24 रुपयाचे शुल्क लागेल. शुल्क भरल्यानंतर शेततळ्यासाठी केलेल्या अर्जाची शुल्क पावती व अर्ज प्रिंट करून घ्यावे.
- पात्र शेतकऱ्यांना लॉटरी लागल्यानंतर Message पाठविण्यात येतात. संबंधित पुढील कार्यवाही कृषी सहाय्यक व कृषी अधिकारी यांच्यामार्फत पूर्ण केली जाते.
हे पण बघा : प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना अंतर्गत मिळवा 35% पर्यंत सबसिडी
शेततळे योजनेसाठी किती अनुदान मिळते ?
– लाभार्थी शेतकऱ्यांना शेततळे अनुदान योजनेअंतर्गत शासनातर्फे ₹75,000 हजार पर्यंत अनुदान हे देण्यात येते.
मागेल त्याला शेततळे योजना साठी अर्ज कुठे करायचा ?
– मागेल त्याला शेततळे योजनासाठी महाडीबीटी (mahadbt) पोर्टलवर जाऊन अर्ज करावे.