Join WhatsApp Group

Namo Shetkari Yojana 2023: मे अखेर शेतकऱ्यांना मिळणार ‘नमो’ चा लाभ. पण त्यासाठी हे काम करणे आवश्यक.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana 2023: जर तुम्ही शेतकरी असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी महासन्मान योजना’ सुरू करण्यात आली आहे. पीएम किसान योजने प्रमाणेच शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून दर चार महिन्यांनंतर 02 हजार देण्यात येतील, म्हणजेच वार्षिक तीन हप्त्यांत शेतकऱ्यांना 06 हजार रुपये देण्यात येतील. नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार हे जाणून घेण्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत वाचा.

Namo Shetkari Yojana 2023: महाराष्ट्र राज्याची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनासुद्धा आर्थिक मदत मिळावी, यासाठी नमो शेतकरी महासन्मान योजना राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूरी देण्यात आली आहे.

हे पण वाचा: प्रत्येक जिल्ह्यात भरणार शासकिय योजनांची जत्रा.

Namo Shetkari Yojana 2023: नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता मे महिन्याच्या शेवटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. त्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधारकार्ड व मोबाईल नंबर लिंक असणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार व मोबाईल नंबरशी लिंक नाहीत त्यांनी लवकरात लवकर लिंक करून घ्यावे, अन्यथा त्या या योजनेचा लाभ मिळणार नाही.

हे पण पहा: या शेतकऱ्यांना मिळणार नाही PM Kisan योजनेचा लाभ.

नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी पात्रता:

  1. लाभार्थी शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  2. जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत तेच शेतकरी नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी पात्र आहेत.
  3. बँक खात्याला आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक.
  4. 01 फेब्रुवारी 2019 पूर्वी जमिनधारक असावा.
  5. सन्मान निधी मिळवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी करावी लागेल. लाभार्थनि त्याच्या नावावरील मालमत्ता नोंदीची माहिती द्यावी.
Join WhatsApp GroupClick Here

शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेची माहिती खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे ही माहिती आपल्या सर्व मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच सरकारी योजनां विषयक माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला फॉलो करा.

हे नक्की वाचा: या योजनेद्वारे महिलांना मिळतील 32 हजार रुपये.

5/5 - (1 vote)

Leave a Comment