Kanda Anudan Yojana 2023
Kanda Anudan Yojana 2023 : नमस्कार शेतकरी बांधवानो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 2022-23 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून प्रति क्विंटल ₹350 अनुदान देण्याची घोषणा महाराष्ट्र शासनाने केली आहे. कांदा अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी आपला कांदा माल विक्री केला असेल, त्या कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार किंवा इतर कांदा खरेदी केंद्राकडे 03 एप्रिल 2023 ते 20 एप्रिल 2023 या कालावधीत विहित नमुन्यातील अर्ज दाखल करायचे आहेत.
हे नक्की बघा: बैलगाडी घेण्यासाठी मिळणार अनुदान
Kanda Anudan Yojana 2023 : कांदा अनुदान मिळवण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, नाफेड केंद्र, तालुका उप तथा सहाय्यक निबंधक, किंवा इतर सहकारी संस्था यांच्याकडून विहित नमुन्यातील अर्ज मोफत प्राप्त करून घ्यावा.
कांदा अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे :
- कांदा विक्रीची पावती
- कांदा पिकाची नोंद असलेला 7/12 सातबारा उतारा.
- बँक पासबुक झेरॉक्स प्रत.
- आधार कार्ड
- सातबारा दुसऱ्या नावावर आणि विक्री पावती दुसऱ्या नावावर असल्यास कुटुंबाचे सहमतीपत्र आवश्यक.
हे पण बघा: शेतीपूरक 07 व्यवसाय जे करतील मालामाल
कांदा अनुदानासाठी अर्ज कसा करावा :
- विहित नमुन्यातील अर्ज पूर्ण भरावा आणि अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
- विहित नमुन्यातील अर्ज 20 एप्रिल 2023 च्या आत आपले अर्ज आपण ज्या ठिकाणी कांदा विक्री केला असेल त्या ठिकाणी आपले अर्ज जमा करावेत.
WhatsApp वर माहिती मिळविण्यासाठी | येथे क्लिक करा |
शेतकर्यांसाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे त्यामुळे ही माहिती आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच शेती विषयक माहिती साठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या.
FAQ For Kanda Anudan Yojana 2023 :
कांदा अनुदानाचा अर्ज कोठे जमा करावा?
ज्या ठिकाणी आपला कांदा माल विक्री केला असेल, त्या कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार किंवा इतर कांदा खरेदी केंद्राकडे
कांदा अनुदानासाठीचा अर्ज कोठे मिळेल?
कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, नाफेड केंद्र, तालुका उप तथा सहाय्यक निबंधक, किंवा इतर सहकारी संस्था
कांदा अनुदानासाठीचा अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख?
20 एप्रिल 2023
कांद्यासाठी किती अनुदान मिळेल?
₹350/- प्रती क्विंटल