वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी व पशुधन मृत झाल्यास मिळणाऱ्या नुकसान भरपाईत वाढ.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी किंवा पशुहानी झाल्यास मिळणार्‍या अर्थिक सहाय्याच्या रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

A) वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास खालील प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येते.

  1. व्यक्तीचा मृत्यू झाल्यास- ₹20 लाखांपैकी ₹10 लाख देय असलेल्या व्यक्तीस तात्काळ धनादेशाद्वारे दिले जातात आणि बाकी ₹10 लाख त्याच्या संयुक्त खात्यामध्ये फिक्स डिपॉजीट केले जातात.
  2. व्यक्तीस कायमचे अपंगत्व आल्यास- ₹5 लाख
  3. व्यक्ती गंभीर जखमी झाल्यास- ₹ 1 लाख 25 हजार
  4. व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास- औषधोपचाराचा खर्च देण्यात येतो.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी व पशुधन मृत झाल्यास मिळणाऱ्या नुकसान भरपाईत वाढ.

👉शेतातील पिकांची नोंदणी करण्यासाठी भेटली मुदतवाढ👈

B) वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पशुधन हानी झाल्यास खालील प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येते.

  1. गाय, म्हैस, बैल, यांचा मृत्यू झाल्यास- जनावरांचा च्या बाजारभाव किंमतीच्या 75% किंवा ₹70 हजार यांपैकी कमी असणारी रक्कम.
  2. बकरी, मेंढी व इतर जनावरांचा मृत्यू झाल्यास- बाजारभाव किंमतीच्या 75% किंवा ₹15 हजार यांपैकी कमी असणारी रक्कम.
  3. गाय, म्हैस, बैल यांना कायमचे अपंगत्व आल्यास- बाजारभाव किंमतीच्या 50% किंवा ₹15 हजार यांपैकी कमी असणारी रक्कम.
  4. गाय, म्हैस, बैल, बकरी, मेंढी व इतर पशुधन जखमी झाल्यास- औषधोपचारासाठी येणारा खर्च देण्यात येतो. देय किंमत बाजारभावाच्या 25% किंवा ₹5 हजार प्रति जनावर यांपैकी कमी असणारी रक्कम.

सदरील शासन निर्णय महाराष्ट्र राज्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी व पशुधन मृत झाल्यास मिळणाऱ्या नुकसान भरपाईत वाढ.

👉त्या साठी येथे क्लिक करा👈

शासन निर्णय वाचण्यासाठीयेथे क्लिक करा

कृषी ड्रोन घेण्यासाठी मिळणार 50% ते 75% अनुदान

Rate this post

Leave a Comment