Forest Guard Bharti : वनरक्षकांच्या ७७ हजार पदांच्या भरतीची अफवा व्हायरल

Forest Guard Bharti : वनविभागात आठव, दहावी व बारावी उत्तीर्ण असलेल्या १८ ते २५ वयोगटातील तरुणांना वनरक्षक, वनपालांच्या ७७ हजार पदांच्या भरतीचा फायदा होणार आहे. या भरतीसाठी इच्छुकांनी खाली दिलेल्या ‘लिंक वर क्लीक करावे, अशा माहितीची पोस्ट सोशल मीडियातून अचानकपणे शनिवारी दि.२५ फेब्रुवारी व्हायरल करण्यात आली. राज्य शासनाच्या वनमंत्रालयाकडून अशा प्रकरची कुठलीही जाहिरात देण्यात आलेली नाही. यामुळे या पोस्टमार्फत वनरक्षक, वनपालांच्या भरतीच्या अफवेला बळी पडू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

👇👇👇

👉577 जागांची सरकारी पर्मनंट नोकरी बघा सविस्तर माहिती👈

वनविभागात वनरक्षक, वनपाल पदाकरिता ७७ हजार रिक्त पदांची भरती प्रक्रियेची व्हायरल होणारी पोस्ट ही खोटी असून त्याद्वारे दिशाभूलदेखील होण्याचा धोका असल्याचे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी सांगितले. वनरक्षक भरतीप्रक्रिया स्वतंत्ररीत्या शासनस्तरावर सुरू आहे. याबाबत २७ डिसेंबर २०२२ रोजी शासन निर्णय जाहीर करत वनरक्षक संवर्गातील पदभरतीसाठी सुधारित कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केली आहे. यानुसार पदभरती प्रक्रिया राबविली

हे पण नक्की बघा : आत्ता विद्यार्थ्यांना मिळणार फ्री संगणक, बघा सविस्तर माहिती

जाणार आहे; मात्र अद्याप अधिकृतरीत्या पदभरतीची जाहिरात शासनाच्या कुठल्याही अधिकृत पदांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली गेलेली नाही. यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या वनरक्षक, वनपाल पदांच्या भरतीप्रक्रियेच्या माहितीची सत्यता पडताळूनच कुठल्याही प्रकरचा आर्थिक व्यवहार करावा, असे आवाहन नाशिकमधील वरिष्ठ दर्जाच्या वनाधिकाऱ्यांनी केले आहे.

Source : Lokmat

👉दि लातूर अर्बन को-ऑप बँक लि मध्ये नोकरीची सुवर्णसंधी👈

नवीन भरतीची जाहिरातसाठी :

Rate this post

Leave a Comment