UPSC CSE 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे(UPSC) घेण्यात येणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 साठीची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. 1105 जागांसाठी UPSC ची ही परीक्षा होणार आहे. नागरी सेवा पूर्व परीक्षा (UPSC CSE) 28 मे 2023 रोजी होणार आहे. त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी UPSC च्या अफिशियल वेबसाईट द्वारे आपला अर्ज 21 फेब्रुवारी 2023 च्या आत ऑनलाइन भरणे आवश्यक आहे.
UPSC CSE 2023 पुढील पदांसाठी होणार आहे
- भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)
- भारतीय परराष्ट्र सेवा (IFS)
- भारतीय पोलीस सेवा (IPS)
- भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा,गट ‘अ’
- भारतीय नागरी लेखा सेवा, गट ‘अ’
- भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा, गट ‘अ’
- भारतीय संरक्षण लेखा सेवा, गट ‘अ’
- भारतीय संरक्षण संपदा सेवा, गट ‘अ’
- भारतीय माहिती सेवा, गट ‘अ’
- भारतीय पोस्टल सेवा, गट ‘अ’
- भारतीय P&T खाती आणि वित्त सेवा, गट ‘अ’
- भारतीय रेल्वे संरक्षण दल सेवा, गट ‘अ’
- भारतीय महसूल सेवा (सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर) गट ‘अ’
- भारतीय महसूल सेवा (आयकर) गट ‘अ’
- भारतीय व्यापार सेवा, गट ‘अ’ (ग्रेड III)
- भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा, गट ‘अ’
- सशस्त्र दल मुख्यालय नागरी सेवा, गट ‘ब’ (विभाग अधिकारी श्रेणी)
- दिल्ली, अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप, दमण आणि दीव आणि दादरा आणि नगर हवेली
नागरी सेवा (DANICS), गट ‘ब’ - दिल्ली, अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप, दमण आणि दीव आणि दादरा आणि नगर हवेली
पोलीस सेवा (DANIPS), गट ‘ब’ - पाँडिचेरी नागरी सेवा (PONDICS), गट ‘ब’
- पाँडिचेरी पोलिस सेवा (PONDIPS), गट ‘ब’
UPSC साठी शैक्षणिक पात्रता –
उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा व कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
UPSC साठीचे वय –
01 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 32 वर्षे
OBC – 3 वर्षे सूट , SC/ST – 5 वर्षे सूट
UPSC अर्जाचे शुल्क –
General आणि OBC – 100/-
SC/ST/PWD/महिला – फी नाही
UPSC महत्त्वाच्या तारखा –
अर्ज सुरु होण्याची तारीख : | 01-02-2023 |
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : | 21-02-2023 |
पुर्व परीक्षा : | 20-05-2023 |
मुख्य परीक्षा : | लवकरच |
UPSC अर्ज कसा भरावा –
UPSC CSE 2023 ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php हया बेबसाइटवर जाऊन आपण पूर्ण अर्ज भरू शकता.
अधिक माहितीसाठी https://www.upsc.gov.in/ ह्या बेबसाइटला भेट द्या.