Sarkari Yojana: नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज या लेखात शेतकऱ्यांसाठीच्या अशा 05 शेती योग्य सरकारी योजनांची माहिती देणार आहे, ज्या योजनांद्वारे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि थोड्याफार प्रमाणात भांडवल पण उपलब्ध होईल. तर शेतकरी मित्रांना शेतकऱ्यांना शेती करणे सोपे जावे म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित असते. ज्यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी थोड्याफार प्रमाणात हातभार लाभेल. तर अशाच 05 शेतीविषयक सरकारी योजनांची माहिती करून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. कोणत्या आहेत त्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण योजना याची माहिती आपण पुढे घेणार आहोत
1. प्रधानमंत्री कुसुम सोलरपंप योजना (PM Kusum Yojana): प्रधानमंत्री कुसुम योजना केंद्र सरकारद्वारे राबविण्यात येते PM Kusum Yojana या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या विहिरीवर किंवा बोअरवेल वर सोलर पंप बसवण्यासाठी 90 टक्के अनुदान देते. सोलर पंप योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होते त्यामुळे पिकांता पाणी देण्यासाठी रात्रपाळी करावी लागत नाही. हा या PM Kusum योजनेचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. PM Kusum योजने विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी PM KUSUM – MNRE या पोर्टलवर जा. (Sarkari Yojana)
हे पण वाचा: महिलांना मिळणार ₹32.00 हजार
2. पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Sanman Nidhi Yojana): पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाद्वारे जमिनधारक शेतकऱ्यांसाठी राबविली जाणारी एक योजना आहे. PM Kisan योजनेची सुरूवात 01 डिसेंबर 2018 रोजी केली होती. PM Kisan योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये तीन वेगवेगळ्या हफ्त्यात जमीनधारक शेतकऱ्यांना दिले जातात. PM Kisan योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहिती मिळवण्यासाठी PM KISAN SAMMAN NIDHI या वेबपोर्टल ला भेट द्या. (Sarkari Yojana)
3. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना (Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana): ही योजना महाराष्ट्र शासनाद्वारे राबविली जाते.शेती करताना नैसर्गिक अपघात शेती जसे अंगावर वीज पडणे, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याची कारणामुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काही शेतकऱ्यांना या अपघातामुळे अपंगत्व येते अशा शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यांना किंवा शेतकरी कुटुंबाला ₹2 लाख रुपयांपर्यंतचा विमा लाभ मिळतो. महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत. Gopinath Munde Shetkari Apghat Vima योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कृषी विभागाच्या Krishi Maharashtra या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. (Sarkari Yojana)
हे नक्की वाचा: तरुणांना व्यवसायासाठी मिळणार 50 लाख रुपये.
4. पीएम किसान मानधन योजना (PM Kisan Mandhan Yojana): पीएम किसान मानधन योजना केंद्र सरकारतर्फे शेतऱ्यांसाठी राबवली जाणारी योजना आहे. PM Kisan Mandhan योजनेत शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर या योजनेअंतर्गत दरमहा ₹3000/- पेंशन दिली जाते. PM Kisan Mandhan योजनेत वय वर्षे 18 ते 40 या वयोगटातील कोणतेही शेतकरी भाग घेऊ शकतात. या योजनेत भाग घेण्यासाठी वयानुसार मासिक ₹55 ते ₹200 भरावे लागतात. या योजनेत भाग घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी PM KISAN MANDHAN YOJANA या वेबपोर्टलला भेट द्या. (Sarkari Yojana)
5. नमो शेतकरी महसन्मान निधी योजना (Namo Kisan Yojana): नमो शेतकरी महसन्मान निधी योजना ही योजना महाराष्ट्र शासनातर्फे सुरु करण्यात आली आहे.PM Kisan Sanman Nidhi योजने प्रमाणेच नमो शेतकरी महसन्मान निधी योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकर्यांना वार्षिक ₹6000/- लाभ मिळेल. (Sarkari Yojana)
WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
भारतातील सर्वच शेतकऱ्यांसाठी ही माहिती खूप उपयुक्त ठरेल त्यामुळे ही माहिती आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच शेतीविषयक सरकारी योजनांची (Sarkari Yojana) माहिती मिळवण्यासाठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या.
वाचा: 10 वी 12 वी चा निकाल या तारखेला लागणार.
Sarkari Yojana: Hello farmers, today in this article we are going to give information about 05 Farm Friendly Government Schemes for Farmers, through which the schemes will encourage farmers to do farming and also provide some amount of capital. The central government and the state government are implementing various schemes for the farmers to make farming easier for the farmers. Which will help the farmers to a small extent for farming.
This information will be very useful for all the farmers in India so be sure to share this information with your friends and visit the website Aapli Service to get information about similar government schemes (Sarkari Yojana) for agriculture.