4122 तलाठी पदांची लवकरच होणार भरती | Talathi Bharti

Talathi Bharti :  मागील काही वर्षांपासून रखडलेल्या तलाठी पदाची भरती लवकरच सुरु होणार आहे. राज्य शासनाने चार हजार तलाठ्यांची पदे भरण्यास मान्यता दिली आहे. राज्यातील महसूल विभागाच्या नाशिक, पुणे, कोकण, संभाजीनगर(औरंगाबाद), अमरावती आणि नागपूर या विभागांतील रिक्त असलेली पदे भरण्यात येणार आहेत. भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त हे राज्यस्तरीय समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत, तर उपजिल्हाधिकारी हे जिल्हास्तरावर समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.

सध्या चार हजार पदे भरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे पण राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विविध गावांत नक्की किती तलाठी पदे ही रिक्त आहेत त्याचा आढावा घेण्याचे काम हे सुरु केले त्यानुसार तलाठ्यांची पदे कदाचित वाढू शकतात.

तलाठी पदभरती ही ऑनलाईन परीक्षा पद्धतीने होणार त्यासाठी शासन कंपन्यांची योग्यता तपासून योग्य कंपनीची निवड केली आहे. तसेच निवडलेल्या कंपनीला परीक्षेचे नियोजन आणि परीक्षेचे वेळापत्रक इत्यादी प्रक्रिया ह्या सुरळीत आणि वेळेत पार पाडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

👉हे पण नक्की बघा👈

शैक्षणिक पात्रता:

  1. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा
  2. माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक (MS-CIT, CCC आदि)
  3. मराठी व हिंदी भाषा येणे आवश्यक

वयाची अट:

क्र.प्रवर्गवय
१.खुला प्रवर्ग18 ते 38 वर्ष
२.मागासवर्गीय18 ते 43 वर्ष

 

तलाठी परीक्षेचा अभासक्रम : स्वरूप

क्र.विषय.प्रश्न संख्या.गुण.
१.मराठी२५५०
२.इंग्रजी२५५०
३.अंकगणित व बुद्धिमत्ता२५५०
४.सामान्यज्ञान२५५०
Total१००२००

 

Rate this post

Leave a Comment