SSC Re Exam: ‘या’ तारखेपर्यंत दहावीच्या (10 वी) पुरवणी परीक्षेसाठी करता येणार अर्ज.

SSC Re Exam: महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी च्या (SSC) बोर्ड परीक्षेचा निकाल 02 जून रोजी जाहिर झाला त्यामध्ये बरेचसे विद्यार्थी नापास झाले आहेत. नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून येत्या जुलै-ऑगस्ट मध्ये बोर्डाकडून इयत्ता दहावीची पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी दिनांक 16 जून 2023 पर्यंत नियमित शुल्कासह तर विलंब शुल्क भरून दिनांक 21 जून 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत राहणार आहे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे सचिव अनुराधा ओक यांनी सांगितले आहे

हे पण वाचा: आता करा मोफत आधार कार्ड अपडेट.

10 वी (SSC) पुरवणी परीक्षेसाठी अर्ज कसा करावा? / How to Apply SSC Re Exam 2023?

  1. 10वी च्या पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी http://www.mahasscboard.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.
  2. नियमित शुल्कासह दिनांक 16 जून 2023 पर्यंत अर्ज करता येईल तर
  3. दिनांक 21 जून 2023 पर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे.
  4. याच्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही, असेही बोर्डाने सांगितले आहे.

केव्हा होईल 10 वी ची पुरवणी परीक्षा?

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार इयत्ता 10वी ची पुरवणी परीक्षा ही दिनांक 18 जुलै 2023 ते दिनांक 01 ऑगस्ट 2023 या कालावधीत होणार आहे.

WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

दहावीच्या (SSC) विद्यार्थ्यांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा व अशाच उपयुक्त माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला फॉलो करा.

FAQ About SSC Re Exam 2023

Q. 10वी पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत?

Ans. नियमित शुल्कासह 16 जून 2023
विलंब शुल्कासह 21 जून 2023

Q. 10 वी ची पुरवणी परीक्षा केव्हा होईल?

Ans. दिनांक 18 जुलै 2023 ते दिनांक 01 ऑगस्ट 2023 या कालावधीत होईल.

Rate this post

Leave a Comment