Ration Update: रेशनकार्ड धारकांसाठी राज्य शासन तसेच केंद्र शासन नवनवीन उपक्रम तसेच योजना राबवित असते. ज्यामुळे रेशनकार्ड धारकांना त्यांचे आयुष्य सुखकर व सोयीचे होण्यासाठी हातभार लावला जातो. त्याचप्रकारे महाराष्ट्र सरकारतर्फे रेशन आपल्या दारी या योजनेची अंमलबजावणी ही लवकरच होणार आहे. रेशन आपल्या दारी योजनेची सुरुवात मुंबई व ठाणे जिल्ह्यातून होणार आहे. काय आहे रेशन आपल्या दारी योजना जाणून घेण्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
हे पण वाचा: फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार PM Kisan योजनेचा लाभ.
काय आहे रेशन आपल्या दारी योजना?
महाराष्ट्र सरकारच्या शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या धर्तीवरच राज्य सरकारतर्फे रेशन आपल्या दारी ही योजना राबविण्यात येणार आहे. सुरुवातीला रेशन आपल्या दारी या योजनेची अंमलबजावणी ही मुंबई व ठाणे जिल्ह्यात होणार आहे. रेशन आपल्या दारी या योजनेअंतर्गत रेशनकार्ड धारकांना शिधावाटप रथातून घरपोच अन्नधान्यांचे वितरण हे करण्यात येणार आहे. म्हणूनच या योजनेचे नाव हे रेशन आपल्या दारी योजना ठेवण्यात आले आहे.
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
हे पण नक्की बघा : किसानों के लिए 05 सबसे फायदेमंद योजनाएँ जिनका किसानों को अवश्य लाभ उठाना चाहिए.
रेशन आपल्या दारी या योजनेची माहिती सर्व रेशनकार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे ही माहिती इतरांना देखील शेअर करा तसेच अशाच सरकारी योजनांच्या अधिक माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला फॉलो करा व WhatsApp वर लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी कृषी योजना या ग्रुपला जॉईन करा.