PMJJBY : Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY) प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही एक भारतीय वित्त मंत्रालयाची विमा योजना आहे. जी विमाधारक व्यक्तीचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास विमा कवर करते. PMJJBY YOJANA एलआयसी आणि इतर जीवन विमा कंपन्यांमार्फत प्रदान केली जाते. PMJJBY योजनेचे फायदे काय आहेत? पात्रता काय आहे? PMJJBY योजनेसाठी अर्ज कसा करावा या सर्व माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
PMJJBY योजनेचे फायदे :
- Pradhan Mantri Jivan Jyoti Bima Yojana (PMJJBY) या योजेनेचे सदस्यत्व घेणारे 18 ते 50 वर्षे वयोगटातील बँक खातेदारांचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास ₹2 लाखांचा लाभ हा त्यांच्या वारसांना मिळतो.
- PMJJBY योजनेचे सदस्यत्व घेतलेल्या व्यक्तींच्या बँक खात्यातून वार्षिक ₹330/- ऑटोमेटिक डेबिट केले जातात.
हे पण नक्की बघा : घरकामगार महिलांना मिळणार 10 हजार रुपये
Pradhan Mantri Jivan Jyoti Bima Yojana (PMJJBY) योजनेसाठी पात्रता :
- अर्जदाराजे वय हे 18 ते 50 वर्षांदरम्यान असावे.
- अर्जदाराचे बँकेत / पोस्ट बँकेत खाते असावे.
How to Apply for PMJJBY / प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी अर्ज कसा करावा :
- प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- खाली दिलेल्या लिंकवरून विहित नमुन्यातील अर्ज डाऊनलोड करून प्रिंट करावा.
- विहित नमुन्यातील अर्ज भरून सही करावी आणि आवश्यक कागदपत्रे self attested करून अर्जासोबत जोडावेत.
- वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या बँकेत तुमचे खाते असेल त्या बँक अधिकाऱ्या कडे अर्ज जमा करावा.
- बँक अधिकाऱ्याकडून तुम्हाला अर्जाची पावती आणि विमा प्रमाणपत्र देण्यात येईल.
अर्ज नमुना : | येथे क्लिक करा |
ही महिती देशातील सर्व नागरिकांसाठी महत्त्वाची आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच सरकारी योजनांविषयी माहितीसाठी www.aapliservice.com या वेबसाईटला भेट द्या.
हे पण नक्की बघा : प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना अंतर्गत मिळवा 35% पर्यंत सबसिडी